मुंबईत ९,६६५ इमारतींमध्ये कोरोना

Last Updated: Sep 20 2020 1:29AM
Responsive image


मुंबई : पुढारी वृत्तसेवा

मुंबई शहरासह उपनगरात 9,665 इमारतींमध्ये कोरोनाने प्रवेश केला आहे. गेल्या सात दिवसांत तब्बल 2,448 इमारतींमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडल्याने या इमारती तातडीने सील करण्यात आल्या. त्यामुळे इमारतींमध्ये कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याचे सिद्ध झाले आहे.

मुंबईतील कोरोना रुग्ण वाढीचा दर आटोक्यात आणण्यात पालिकेला यश आले होते. दाटीवाटीने वसलेल्या झोपडपट्टीमधील कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेने राबवलेल्या धारावी पॅटर्नचा फायदा झाला. पण कमी लोकसंख्या असलेल्या इमारतींमधील कोरोना आटोक्यात आणण्यात पालिकेला फारसे यश आलेले नाही. त्यामुळे इमारतींमध्ये रुग्णवाढीचा दर दिवसेंदिवस वाढत आहे. 

गणेशोत्सवापूर्वी मुंबई कोरोना रुग्ण सापडलेल्या इमारतींची संख्या जवळपास 4 हजारच्या घरात होती. मात्र गणेशोत्सवानंतर इमारतींमध्ये रुग्ण सापडण्याचे प्रमाण वाढले. 11 सप्टेंबरला 7,217 इमारती सील होत्या. त्यानंतर सात दिवसांत हा आकडा 9,665 इतका झाला. रोज सुमारे 300 इमारतींमध्ये कोरोना रुग्ण सापडत आहेत. यात बांद्रा पश्चिम, अंधेरी पश्चिम, कांदिवली, बोरिवली व दहिसरमधील इमारतींची संख्या जास्त आहे. इमारतींमधील नागरिक नियमांचे काटेकोर पालन करत नसल्यामुळे कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

इमारतीमधील रहिवाशांना कोरोना संसर्गजन्य आजाराचे गंभीर स्वरूप लक्षात आणून देण्यासाठी प्रबोधन करण्यात येणार आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी या अंतर्गत सोसायटीसाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. या नियमांचे पालन करण्यासाठी पालिका अधिकार्‍यांबरोबरच नगरसेवकही सोसायटीच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा करणार आहेत. नियमांचे पालन न करणार्‍या रहिवाशांवर कारवाई करता येईल का ? याबाबतही विचारविनिमय सुरू आहेे.

खडसेंसोबत गेले भाजपचे कार्यालय!; मुक्ताईनगरात भाजपला कार्यकर्त्यांसह कार्यालयही शोधावे लागणार 


पंकजा मुंडेंनी शरद पवारांना 'या' कारणासाठी केली विनंती, म्हणाल्या...


ठाणे : १०१ तृतीयपंथियांच्या ओट्या भरून दसरा साजरा


करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची महिषासूरमर्दिनी रूपात पूजा 


मिर्झापूर- 2 वेबसीरिजवर मिर्झापूरच्या खासदारांनी केला आरोप, म्हणाले....


साताऱ्यात पोलिसांचे 'मॉक ड्रिल' 


शिवसेनेत जाणार असल्याच्या अफवांवर पंकजा मुंडेंचा खुलासा, म्हणाल्या...


KXIPvsSRH : हैदराबादला पाठोपाठ दोन धक्के


मराठा समाज्यावतीने 'काळी दिवाळी' साजरी करण्याचा इशारा


नाशिक : वन विभागाने चार बिबट्यांना केले जेरबंद