Thu, Jan 28, 2021 06:46होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बॉलिवूडच्या ७ सेलिब्रिटींना कोरोना बाधा

बॉलिवूडच्या ७ सेलिब्रिटींना कोरोना बाधा

Last Updated: Jul 13 2020 8:00AM
मुंबई : वृत्तसंस्था

‘उंगली’ आणि  ‘हर हर ब्योमकेश’ चित्रपटांतील अभिनेत्री रेचल व्हाईट कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. स्वत: रेचलने आपल्या ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली. रेचल होम क्‍वारंटाईन झाली आहे. अवघ्या 24 तासांत बॉलिवूडचे 7 कलावंत बाधित झाले आहेत. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, अनुपम खेर यांच्या आई दुलारीदेवी, राजू खेर आणि अन्य 2 नातेवाईकही कोरोनाने संक्रमित आढळले आहेत. त्यांच्यावर कोकिलाबेनमध्ये उपचार सुरू आहेत.

या आधी जोया मोरानी, करीम मोरानी, शजा मोरानी, किरणकुमार, शिबाशीष सरकार, मोहेना सिंह, जगन्‍नाथ निवांगुणे संक्रमित आढळले आहेत. बोनी कपूर, आमीर खान, करण जोहर आणि अभिनेत्री रेखा यांचे कर्मचारी कोरोना संक्रमित आढळले. 4 सदस्य संक्रमित आढळल्याने एका टी.व्ही. सीरिअलचे चित्रीकरणही थांबविण्यात आले आहे.