Sat, May 30, 2020 13:00होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नवी मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या 28

नवी मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या 28

Last Updated: Apr 06 2020 1:04AM
नवी मुंबई : पुढारी वृत्तसेवा

रविवारी दिवसभरात 3 कोरोना रुग्ण आढळल्यामुळे नवी मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णसंख्या 28 वर गेली आहे.त्यात घणसोलीत गरोदर महिलेसह नेरुळमधील दोन रुग्णांचा समावेश आहे. कोरोनामुळे नेरुळ येथील 72 वर्षीय नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने नवी मुंबईतील मृतांची संख्या  दोनवर पोहोचली. 

घणसोलीतील गरोदर महिला सेक्टर 9 मध्ये राहते. नेरुळमध्ये सेक्टर 23 व 28 मध्ये दोन रुग्ण आढळले. त्यापैकी सेक्टर 28 येथील रुग्णाला संपर्कातून कोरोना झाल्याचे कळते. त्याच्या  घरातील तीन रुग्ण कोरोनाबाधित आहेत. त्याच्या संपर्कातील एकूण 117 जणांची कोरोना चाचणी झाली असून, त्यापैकी 28 रुग्ण पॉझिटिव्ह, तर 79 निगेटिव्ह आले असून 10 जणांचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही.4 रुग्णांचा अहवाल हा पॉझिटिव्हचा निगेटिव्ह आला आहे. वाशी बहुउद्देशीय इमारतीत 21 जणांना क्वारंटाईन केले असून 1096 नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहेत. वाशी रुग्णालयातील विलगीकरण कक्षात 25 जणांना ठेवण्यात आले आहे. कोरोनासाठी सुरू केलेल्या विशेष रुग्णालयात 3 रुग्ण असून क्वारंटाईन कालावधी पूर्ण केलेल्या रुग्णांची संख्या 399 आहे.