Tue, Aug 04, 2020 14:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अल्पवयीन बलात्कार पीडितेला न्यायालयाचा दिलासा

अल्पवयीन बलात्कार पीडितेला न्यायालयाचा दिलासा

Last Updated: Jul 04 2020 8:43PM

संग्रहित छायाचित्रमुंबई : पुढारी वृत्तसेवा 

सांगली येथील बलात्कार पीडित अल्पवयीन मुलीला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. न्यायमूर्ती नितीन जमादार आणि न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठाने अर्भकाला जन्म दिल्यास अल्पवयीन मुलीच्या जीवाला धोका  पोहोचू शकतो. याची दखल घेत २३ आठवड्याच्या गर्भवती अल्पवयीन मुलीला गर्भपाताची परवानगी दिली आहे.

अधिक वाचा : 'त्यामुळे' पीएम मोदींनी दिले नवे चॅलेंज!

१२ वर्षाच्या पीडित मुलीवर तिच्याच परिसरात राहणाऱ्या काही नराधमांनी अनेकदा अत्याचार केले. पोटात दुखत असल्याने मुलीने याची माहिती आपल्या आईला दिली. वैद्यकीय तपासणी केली असता मुलगी गर्भवती असल्याचे आढळून आले. त्यानंतर या प्रकरणी आरोपींविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नियमानुसार २० आठवड्यानंतर गर्भपात करण्यासाठी हायकोर्टाची परवानगी घ्यावी लागते. 

अधिक वाचा : सरकारचं प्राधान्य नेमकं कशाला? फडणवीसांचा सरकारला सवाल

अर्भकाला जन्म दिल्यास आपल्या मुलीला मानसिक आणि शारीरिक इजा पोहोचू शकते. त्यामुळे गर्भपाताची परवानगी द्यावी अशी मागणी करत अल्पवयीन मुलीच्या आईने हायकोर्टात अर्ज केला. न्यायालयाने या प्रकरणी मिरज येथील शासकीय रुग्णालयाने मुलीचा वैद्यकीय तपासणी अहवाल कोर्टात सादर केला. अर्भकाला जन्म दिल्यास पीडित  मुलीच्या जीवाला धोका पोहोचू शकतो असे त्या अहवालात डॉक्टरांनी म्हटले आहे याची दखल घेत हायकोर्टाने मुलीला गर्भपात करण्याची परवानगी दिली.