Thu, Jan 30, 2020 03:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › काँग्रेसचा शिवसेनेवर दबाव; फडणवीसांचा आरोप  

काँग्रेसचा शिवसेनेवर दबाव; फडणवीसांचा आरोप  

Last Updated: Dec 10 2019 8:22PM

मुंबई : पुढारी ऑनलाईन

नागरिकत्‍व सुधारणा विधेयकाच्या बाजूने शिवसेनेने लोकसभेत मतदान केले. मात्र यानंतर राज्‍यसभेत शिवसेनेने या विधेयकाविरोधात संदिग्‍ध भूमिका घेतली आहे. राज्‍यातील महाविकास आघाडीचे सरकार वाचवण्यासाठी शिवसेनेने आपली भूमिका बदलली आहे का? असा प्रश्न माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

लोकसभेमध्ये शिवसेनेने नागरिकत्‍व दुरूस्‍ती विधेयकाच्या बाजूने आपले मतदान केले होते. यानंतर राज्‍यातील काँग्रेसच्या नेत्‍यांनी टीकाही केली होती. यानंतर राज्‍यसभेत या विधेयकाविरोधात संदिग्‍ध भूमिका घेतल्‍याने देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. राज्‍यातले महाविकास आघाडीचे सरकार वाचवण्यासाठी ठाकरे सरकारने दबावातून हा निर्णय घेतला आहे का असा प्रश्न उपस्‍थित केला आहे. आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विधेयकावरून संदिग्‍ध भूमिका मांडली. शिवसेनेने एका रात्रीत आपला निर्णय कोणाच्या दबावापोटी बदलाला असाही प्रश्न फडणवीस यांनी उपस्‍थित केला.

यावेळी फडणवीस यांनी मंत्रिमंडळ स्‍थापन होउनही अद्याप खातेवाटप न केल्‍याने नागपूरच्या अधिवेशनात आमदारांच्या प्रश्नांना उत्‍तरे कोण देणार असा प्रश्न केला आहे. आंम्‍ही दोन आठवड्यांचे अधिवेशन घेण्याची मागणी केली होती. मात्र ती मान्य केली नाही. यावर फडणवीस यांनी अधिवेशनाचे दिवस कमी केले तरी चालतील मात्र शेतकऱ्यांना तात्‍काळ मदत करावी अशी भूमिका मांडली.