Mon, Sep 21, 2020 11:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाण्यात ५०० चौफूची करमाफी लटकली

ठाण्यात ५०० चौफूची करमाफी लटकली

Published On: Dec 21 2017 2:10AM | Last Updated: Dec 21 2017 2:01AM

बुकमार्क करा

ठाणे : प्रतिनिधी

500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देणे कायद्याच्या चौकटीत बसत नसल्याचा मोठा खुलासा बुधवारी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे. प्रशासनाच्या या भूमिकेने सत्तारूढ शिवसेनेला हादरा बसला आहे. विशेष म्हणजे अशाच करमाफीचा प्रस्ताव मुंबई महापालिकेने मंजूर केला असून, तो मंजुरीसाठी राज्य शासनाकडेही पाठवला असताना ठाणे महापालिकेनेच अशी भूमिका का घ्यावी, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

या प्रस्तावाच्या कायदेशीर आणि आर्थिक बाजू तपासूनच त्याचा प्रस्ताव तयार करायचा की नाही, याचा निर्णय घेतला जातो, असे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी सांगितले.

करमाफीच्या प्रस्तावाची सूचना महासभेत मंजूर झाली आहे. त्याचाही अभ्यास सुरु आहे. परंतु, कायदेशीर चौकटीत हा प्रस्ताव होऊ शकत नाही. पालिकेच्या उत्पन्नावर त्याचा कितपत परिणाम होऊ शकतो याचा अभ्यास सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यावर जानेवारीतच याचा अभ्यास करुन तो महासभेसमोर सादर करावा, असे आदेश महापौर मीनाक्षी शिंदे यांनी दिले. तथापि ठाणे महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याची सेनेेने केलेली घोषणा केवळ घोषणाच ठरण्याची शक्यता निर्माण झाल्याने सर्वसाधारण सभेत शिवसेना विरुद्ध भाजप असा वाद रंगला.