Thu, Jun 24, 2021 11:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नवमतदारांसाठी आयोगाची सेल्फी स्पर्धा

नवमतदारांसाठी आयोगाची सेल्फी स्पर्धा

Published On: Apr 20 2019 1:53AM | Last Updated: Apr 20 2019 1:53AM
मुंबई : प्रतिनिधी

मुंबई शहरातील मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने नवमतदारांसाठी ‘माय फर्स्ट व्होट सेल्फी’ या उपक्रमाची घोषणा  जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी केली.

जोंधळे यांनी सांगितले की, मुंबई शहर जिल्ह्यात 18 ते 19 वयोगटामतील 18 हजार मतदारांची नोंद आहे. या सर्वच मतदारांनी लोकसभा निवडणुकीत 29 एप्रिलला 100 टक्के मतदानाचा हक्क बजावणे अपेक्षित आहे. या स्पर्धेत प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून सुमारे 10 मतदारांची निवड केली जाईल. मुंबई शहरातील कुलाबा, मलबार हिल, मुंबादेवी, भायखळा, वरळी, शिवडी, वडाळा, सायन-कोळीवाडा, धारावी, माहिम या 10 विधानसभा मतदारसंघातून एकूण 100 नवमतदारांची अंतिम निवड केली जाईल.निवडलेल्या 100 नवमतदारांना येत्या विधानसभा निवडणुकीत मुंबई शहर जिल्हाचे ‘युवा मतदार दूत’ म्हणून नेमले जाईल. या 100 नवमतदारांमधूनही निवडक 10 युवा मतदारांच्या छायाचित्राचे स्टँडीज त्या-त्या भागात आणि महाविद्यालयात उभारून युवा मतदारांना सन्मानित केले जाईल. 

सेल्फी कुठे पाठवायचा?

जिल्हा निवडणूक यंत्रणेच्या firstvoteselfie@gmail.com या ई-मेल अथवा 9372830071 या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर पाठवावी. ही सेल्फी पाठवातांना संबंधित नवमतदाराने नाव,आडनाव, विधानसभा मतदार संघाचे नाव/नवमतदाराचे नाव/ईपीक नंबर किंवा मतदार यादी भाग क्रमांक व मतदार यादीतील अनुक्रमांकाचा उल्लेख करावा. 29 एप्रिलला मतदान केल्यानंतर सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत एक सेल्फी घेऊन तो प्रशासनाला पाठवायचा आहे. हा सेल्फी मतदाराने  मतदान केद्रांच्या 100 मीटर मर्यादेच्या बाहेर येवून काढावा.