Tue, Aug 04, 2020 13:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'धारावी मॉडेल'चे जागतिक आरोग्य संघटनेकडून कौतुक; मुख्यमंत्र्यांनी दिली शाब्बासकी!

'धारावी मॉडेल'चे जागतिक आरोग्य संघटनेकडून कौतुक; मुख्यमंत्र्यांनी दिली शाब्बासकी!

Last Updated: Jul 11 2020 5:45PM

संग्रहित छायाचित्रमुंबई : पुढारी ऑनलाईन

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी व दाट लोकसंख्या असलेल्या धारावीने स्वयंशिस्तीने कोरोनावर नियंत्रण ठेवता येते हे जगाला दाखवून दिले आणि कोरोना‍ विरूद्धच्या लढ्यातील रोल मॉडेल म्हणून जागतिक स्तरावर नाव नोंदवलं या शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावना व्यक्त केल्या.

अधिक वाचा : सीएम उद्धव ठाकरेंनी धारावीत करून दाखवलं! थेट जागतिक आरोग्य संघटनेकडून कौतुकाची थाप!

धारावी ही आशियातील सर्वांत मोठी झोपडपट्टी आहे. हा झोपडपट्टी परिसर सुरुवातीला कोरोनाचा हॉटस्पॉट बनला होता. मात्र, आता येथील कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आला आहे. याची दखल जागतिक आरोग्य संघटनेने घेतली आहे. जिनिव्हामध्ये एका पत्रकार परिषदेत जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) प्रमुख टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी धारावी मॉडेलचे कौतुक केले. त्यांनी भारताचा उल्लेख करत मुंबईतील सर्वांत मोठी झोपडपट्टी असलेली धारावी येथील कोरोना परिस्थिती कशी नियंत्रणात आली, याबद्दल सांगितले. 

अधिक वाचा : कोरोना नष्ट होणे अशक्य; WHO ने दिली धोक्याची सूचना

मुख्यमंत्री म्हणाले की, जागतिक महामारीच्या परिस्थितीत अशी उदाहरणे साथीच्या प्रादुर्भावातून बाहेर पडण्यासाठी प्रेरणा देऊ शकतात या शब्दात मुख्यमंत्र्यांनी कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतूक केले. धारावीच्या प्रयत्नांची जागतिक स्तरावर घेतलेली नोंद ही कोरोना विरुद्धच्या लढ्याला बळ देणारी आहे.

अधिक वाचा : महाराष्ट्रात संघर्ष सुरु असतानाच केजरीवाल सरकारने घेतला मोठा निर्णय!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापालिका प्रशासन, स्वंयसेवी संस्था आणि स्थानिक धारावीकर यांच्या एकात्मिक प्रयत्नांचे कौतूक करतांना कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या कामगिरीबद्दल शाब्बासकी दिली आहे. हे तुमच्या सर्वांच्या एकात्मिक प्रयत्नांचे यश असल्याचे त्यांनी सांगितले.