Thu, May 28, 2020 16:53होमपेज › Mumbai-Thane-Raigad ›  ठाकरे सरकारचा ‘चेतक’ला लगाम 

 ठाकरे सरकारचा ‘चेतक’ला लगाम 

Last Updated: Dec 03 2019 1:30AM
नवी मुंबई : प्रतिनिधी 

नंदूरबार जिल्ह्यातील तापीनदी किनार्‍यावरील सारंगखेडा गावामधील शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या  घोडे बाजाराची  (चेतक अश्व महोत्सव) लोकप्रियता देशात पसरली आहे. तसेच गेल्या 4 वर्षापासून त्याची ख्याती देशविदेशातपर्यंत गेली असून या महोत्सवासाठी विदेशातील पर्यटक देखील हजेरी लावतात. मात्र, नव्याने विराजमान झालेल्या ठाकरे सरकारने वित्तीय अनियमितता कारणास्तव या चेतक महोत्सवी अश्वाला लगाम लावत शासकीय निधी रोखला असून  गेल्या सरकारच्या काळातील केलेले करारही रद्द करण्यात आले.   

सारंगखेडा यात्रेनिमित्ताने घोडे बाजाराला  300 वर्षाच्या परंपरा आहे. येथे देशातील दुसर्‍या क्रमांकाचा घोडे बाजार भरत असतो. तब्बल 1 महिना चालणार्‍या या अश्व महोत्सवात 50 हजारापासून कोटींपर्यंत घोड्याची विक्री होत असते. याकालात कोट्यांवधींची उलाढाल होत असते. गेल्या सरकारमधील पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसाच्या उपस्थित आयोजित केलेल्या कार्यक्रमात जागतिक दर्जाचे भव्य अश्व संग्रहालय उभारण्याचा घाट घातला होता.

मात्र,राज्यात सत्ताबदल झाल्याने नुतन मुख्यमंत्री यांनी अनावश्यक खर्चाला कात्री लावण्याचे धोरण निश्चित केले आहे. तसेच धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि तालुका पंचायत समितीच्या निवडणूकीची आचारसंहिता सुरू आहे, या यात्रेमुळे मतदारांवर परिणाम होवू नये. त्याचप्रमाणे महोत्सवाच्या आयोजना करिता  महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने केलेल्या करारानुसार निधी उपलब्ध करुन देण्याचा प्रस्ताव नियोजन व वित्त विभागास मान्यतेसाठी सादर करण्यात आला. राज्य पर्यटन विकास महामंडळाने लल्लूजी अँड सन्स यांच्यासोबत केलेल्या करारास तसेच त्यांच्या मसुद्यास शासनाची मान्यता घेतलेली नाही.

शिवाय हा करार केंद्र शासनाच्या धोरणानुसार नाही. त्याचप्रामाणे याप्रकरणात वित्तीय अनियमितता झाली असल्याने प्रस्ताव अमान्यकरून कंपनीसोबतचा केलेला करारदेखील  रद्द करण्यात आदेश पर्यटन कक्षाधिकारी यांनी गुरुवार 28 रोजी व्यवस्थापकीय संचालक पर्यटन विकास महामंडळाला देण्यात आलेत.