Sun, Aug 09, 2020 01:57होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मंत्रिमंडळाच्या दोन खात्यात बदल; जयंत पाटलांना मिळाले 'हे' खाते

मंत्रिमंडळाच्या दोन खात्यात बदल; जयंत पाटलांना मिळाले 'हे' खाते

Last Updated: Dec 14 2019 2:09PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

शपथविधीनंतर १५ दिवसांपासून रखडलेले महाविकास आघाडी सरकारचे खातेवाटप दोन दिवसापूर्वी जाहीर झाले. परंतु, या खातेवाटपात काहीसा बदल करण्यात आला आहे. याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून (CMO Maharashtra) देण्यात आली. 

राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांच्याकडे अर्थ व नियोजन, सहकार, गृहनिर्माण यांसह एकूण पाच खाती देण्यात आली आहेत. राष्ट्रवादीचे दुसरे मंत्री छगन भुजबळ यांना ग्रामविकास आणि जलसंपदा विभागाचे मंत्री करण्यात आले. परंतु, याच खातेवाटपात आता बदल करण्यात आला आहे. 

जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास हे खाते जयंत पाटील यांच्याकडे तर अन्न व नागरी पुरवठा, अल्पसंख्याक विकास आणि कल्याण हे खाते छगन भुजबळ यांच्याकडे देण्यात आले आहे.

मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील जयंत पाटील व छगन भुजबळ यांच्याकडील काही खात्यांमध्ये केले बदल. या खातेवाटपाच्या बदलाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मान्यता दिली आहे. असे देखील ट्विटमध्ये म्हटले आहे.