Thu, Dec 03, 2020 07:22होमपेज › Mumbai-Thane-Raigad › उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्व सोयीचे; चंद्रकांत पाटील यांची टीका

उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्व सोयीचे; चंद्रकांत पाटील यांची टीका

Last Updated: Oct 27 2020 1:32AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या भाषणात पुन्हा एकदा त्यांच्या तथाकथित हिंदुत्वाच्या नावाने गाजावाजा केला. मात्र, सत्तेच्या लालसेपोटी सोयीनुसार ते हिंदुत्वाची व्याख्या बदलत आहेत, अशी टीका करताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने अजून किती दिवस पोळ्या भाजणार? असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी केला.

देशाच्या सर्वोच्चपदी असणार्‍या लोकांबद्दल अगदी अर्वाच्य भाषेचा उपयोग केला. तुम्ही राज्यप्रमुख आहात याचा कदाचित तुम्हाला विसर पडला असल्याची प्रचिती आली. ज्यांच्या स्मारकाच्या ठिकाणी कार्यक्रम चालला होता, त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हिंदुत्वदेखील तुमच्या पचनी पडले नाही, असे पाटील म्हणाले.

सरसंघचालक मोहन भागवत यांच्याच मार्गांवर आम्ही चालत आहोत. सरसंघचालकांनी कालच्या भाषणात एक वक्‍तव्य केले की, हिंदू, हिंदुत्व, हिंदुराष्ट्र याबाबत भ्रम निर्माण करणारे काही लोक आहेत, हे मुळात तुमच्यासाठी होते, असा टोलाही त्यांनी लगावला.