सीबीएसईचा दहावीचा निकाल जाहीर; पहा एका क्लिकवर...

Last Updated: Jul 15 2020 1:53PM
Responsive image
file photo


नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) आज दहावीचा निकाल जाहीर केला. हा निकाल सीबीएसईच्या cbse.nic.in या मुख्य वेबसाईटवर तसेच cbseresults.nic.in वर पाहता येणार आहे. यंदा ९१.४६ टक्के विद्यार्थी पास झाले आहेत. गेल्या वर्षी ९१.१० टक्के विद्यार्थी पास झाले होते. याबाबतची घोषणा मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी केली आहे. 

IVRS द्वारे पहा निकाल 

सीबीएसईने आयव्हीआरएसची सुविधा दिली आहे. यासाठी आपल्याला खाली दिलेल्या नंबरवर कॉल करायचा आहे. यानंतर त्या कॉलवर दरम्यान तुम्हाला नंबर विचारला असता मोबाईलमध्येच आपला रोल नंबर आणि जन्मतारीख प्रविष्ट करा. तुम्हाला निकाल मिळेल.

या नंबरवरती करा कॉल
011-24300699
011-28127030

UMANG app द्वारे पाहू शकता निकाल 

तुम्ही तुमच्या मोबाईल वर उमंग ॲप ही डाऊनलोड करुन निकाल पाहू शकता. येथे आपल्याला आपला रोल नंबर व जन्म तारीख देणे गरजेचे आहे. प्ले स्टोअर किंवा ios वरुन हे ॲप डाऊनलोड करु शकता. 

SMS द्वारे पाहू शकता निकाल 

सीबीएसई दहावीचा निकाल तुम्ही कोणत्याही मोबाईलवर एसएमएसद्वारे पाहू शकता. तुम्हाला फक्त एक एसएमएस पाठवायचा आहे. यासाठी तुम्ही तुमच्या मोबईलच्या मेसेज बॉक्स मध्ये जाऊन टाईप का cbse10 12345678 आणि 7738299899 या नंबरवरती पाठवा.

DigiLocker द्वारे पाहू शकता निकाल
तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये डिजिलॉकर डाऊनलोड करावे लागणार आहे. यानंतर डिजिलॉकरमध्ये साईन अप करा. साईन अप करताना सीबीएसईमध्ये रजिस्टर्ड आपल्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल. तो ओटीपी त्यात टाईप केल्यानंतर तुम्ही तुमचा युजरनेम आणि पासर्वड क्रिएट करु शकता. या अकाऊंटमध्ये तुम्हाला तुमचा निकाल मिळेल.

निकाल जाहीर झाल्यानंतर बोर्ड सर्व शाळांमध्ये सर्व विद्यार्थ्यांचा निकाल ऑनलाईन पाठवते. जर तुम्हाला वरती दिलेल्या कोणत्याही माध्यमातून आपला निकाल पाहता आला नाही तर तुम्ही शाळेशी संपर्क साधून निकाल मिळवू शकता.