Thu, Aug 06, 2020 03:43होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सीबीएसई १२ वी परीक्षेचा निकाल जाहीर

सीबीएसई १२ वी परीक्षेचा निकाल जाहीर

Last Updated: Jul 13 2020 1:04PM

file photoनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) १२ वी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. एकूण पास टक्केवारी ८८.७८ टक्के एवढी आहे. हा निकाल http://cbseresults.nic.in. या सीबीएसईच्या अधिकृत वेबसाईटवर पहायला मिळणार आहे.

या परीक्षेसाठी एकूण १२ लाख ३ हजार ५९५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तर प्रत्यक्षात ११ लाख ९२ हजार ९६१ विद्यार्थ्यांचा परीक्षेत सहभाग होता. यातील १० लाख ५९ हजार ८० विद्यार्थी पास झाले आहेत. मुलींचे पास होण्याचे प्रमाण ९२.१५ टक्के तर मुलांचे पास होण्याचे प्रमाण ८६.१९ टक्के एवढे आहे. यंदा पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी गेल्या वर्षीच्या तुलनेत ५.३८ टक्के अधिक आहे.

केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे. सर्व विद्यार्थ्यांचे त्यांनी अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण हे आमचे प्राधान्य आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

 

Image