Wed, Apr 01, 2020 07:14



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › उद्योगपती रतन टाटा यांनी शेअर केला हृदयस्पर्शी व्हिडीओ

उद्योगपती रतन टाटा यांनी शेअर केला हृदयस्पर्शी व्हिडीओ

Last Updated: Feb 22 2020 10:36AM




मुंबई : पुढारी वृत्तसेवा

प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून  एक व्हिडीओ शेअर केला आहे. सुमारे 3 मिनिटांच्या या व्हिडीओतून एक सफाई कामगाराचा मुलगा ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यासंदर्भात भावनिक साद घालतो. 

‘माझा बाबा देश चालवतो. तो डॉक्टर नाही तरी तो रोग पळवितो, अशी घातलेली साद सहज मनाला भिडते. हाताने मैला आणि कचरा उचलणार्‍या कामगारांच्या आयुष्यात सुधारणेसाठी टाटा ट्रस्टच्या ‘मिशन गरिमा’ या उपक्रमाचा एक भाग म्हणजे हा व्हिडीओ आहे.

या व्हिडीओमध्ये एक शालेय विद्यार्थी आपले शिक्षक, वर्गमित्र, व त्यांच्या पालकांसमोर आपल्या वडिलांबद्दल सांगत आहे. ‘मेरा बाबा देश चलाता है’ या ओळीने सुरू होऊन, सिर्फ मेरे बाबासे देश मत चलाओ, क्योंकी ‘देश को देश का हर आदमी चलाता है...’ या ओळीने शेवट होणारा हा व्हिडीओ सर्वांच्याच  मनात घर करतो.

व्हिडीओमध्ये मुलगा सांगतो, ‘माझे बाबा देश चालवतात. तो नेता नाही, पण तो देश चालवतो, तो डॉक्टर नाही तरी तो रोग पळवितो. तो पोलिस पण नाही; मात्र देशाची घाण मिटवतो. तो सैन्यातही नाही, पण घाणेरड्या शत्रूंसोबत लढाई करतो.’ 

मुलगा पुढे म्हणतो, जर माझा बाबा कामावर गेला नाही तर भारतातील प्रत्येक घर थांबेल. जेवण बनणार नाही, आंघोळ होणार नाही, रस्त्यावर चेंगराचेंगरी होईल, मुलं शाळेत पोचणार नाहीत, डॉक्टर रुग्णालयात तर मंत्री मंत्रालयात पोहोचणार नाहीत. सगळा देश बेहाल होईल. माझा बाबा आपल्या सगळ्यांचे आयुष्य सहज आणि सुलभ करीत आहे. देशातील कोणताही बाबा जे काम करू इच्छित नाही ते काम माझे बाबा करतात. कारण माझ्या बाबांना देश हवा आहे!

हॅशटॅग व्हायरल

खुद्द रतन टाटा यांनी ढुेइळपीङळषशथळपी या हॅशटॅगने हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा हॅशटॅग खूप व्हायरल झाला. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. सफाई कामगारांच्या मुलांना त्यांच्या पित्याचे सुख लाभू द्या. ओला आणि वाळलेला कचरा वेगळा करू या, आपले कर्तव्य आपण करुया. आपले शहर जे स्वच्छ दिसते, ते या लोकांच्या योगदानातून आहे हे विसरता कामा नये, असेही टाटा यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

View this post on Instagram

In Mumbai, a city of 23 million, only 50,000 individuals are employed as sanitation workers. They are working in difficult conditions every single day to tackle the enormous amount of waste that Mumbai generates. As a @tata_trusts initiative, Mission Garima is working to provide safe, hygienic and humane working conditions for sanitation workers who are severely affected doing the unimaginable for the city so that we may find it clean! #TwoBinsLifeWins is a campaign urging citizens to segregate their biodegradable and non-biodegradable waste to help reduce the burden on these hardworking men and women. The links below will help you dispose of your waste responsibly and support our initiative. After all, this country is run by each one of us. https://www.tatatrusts.org/ #TwoBinsLifeWins

A post shared by Ratan Tata (@ratantata) on