Fri, Oct 30, 2020 19:34होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भिवंडीत तीन मजली इमारत कोसळली; १० जण ठार

भिवंडीत तीन मजली इमारत कोसळली; १० जण ठार

Last Updated: Sep 21 2020 8:31AM

घटनास्थळी अग्निशामक व ठाणे येथील TDRF व NDRF चे जवान मदतकार्य करत आहेत.भिवंडी : पुढारी वृत्तसेवा 

भिवंडी शहरातील धामणकर नाका पटेल कंपाऊंड येथे एक तीन मजली इमारत पत्याप्रमाणे कोसळून दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पुढे मिळाली आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. 

रात्रीची वेळ असल्याने सर्व कुटुंबीय घरात झोपलेले असताना ही दुर्घटना घडल्याने या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली सुमारे १०० नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

वाचा : कंगनाचा पुन्हा सरकार, पालिकेवर निशाणा

पटेल कंपाऊंड येथील सुमारे तीस वर्षे जुनी एल टाइपमधील ही जिलानी बिल्डिंग धोकादायक म्हणून महानगरपालिकेने घोषित करून या इमारतीस दोन वेळा नोटीस बजावली होती. या इमारतीचा एक भाग पूर्ण कोसळला असून मजले गाडले आहेत. घटनास्थळी अग्निशामक व ठाणे येथील TDRF व NDRF चे जवान मदतकार्य करत आहेत. आतापर्यंत ढिगाऱ्याखालून दहा जणांना जखमी अवस्थेत बाहेर काढले आहे. त्यांना आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वाचा : मुंबई : एका दिवसात १९८ पोलीस बाधित

 "