Thu, Jan 30, 2020 01:17होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिवसेना नगरसेवकाच्या हत्येप्रकरणी अरुण गवळीची जन्मठेपेची शिक्षा कायम

शिवसेना नगरसेवकाच्या हत्येप्रकरणी अरुण गवळीची जन्मठेपेची शिक्षा कायम

Last Updated: Dec 09 2019 1:08PM

कुख्यात डॉन अरुण गवळीमुंबई : पुढारी ऑनलाईन

एकेकाळी आपल्या दहशतीने मुंबईवर अधिराज्य गाजविणारा कुख्यात डॉन अरुण गवळी याची जन्मठेपेची शिक्षा आज, सोमवारी मुंबई हायकोर्टाने कायम ठेवली. शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांची हत्या केल्याच्या आरोपात अरुण गवळीला विशेष ट्रायल कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. गवळी २००८ पासून तुरुंगात आहे. ही शिक्षा हायकोर्टाने कायम ठेवली आहे.

मुंबईमधील असल्फा भागात २ मार्च २००७ रोजी शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांची मुंबईत हत्या करण्यात आली होती. त्यानंतर २०१२ मध्ये विशेष कोर्टाने अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. अरुण गवळी याच्या इशाऱ्यावरूनच ही हत्या करण्यात आल्याचे तपासातून उघड झाले होते. यासाठी गवळीने ३० लाखांची सुपारी दिली होती, अशीही माहिती समोर आली होती. या प्रकरणी गवळी याच्यासह इतर दहाजणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला मुंबई हायकोर्टात आव्हान दिले होते. ही याचिका फेटाळत हायकोर्टाने जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे.