मुंबई : पुढारी ऑनलाईन
जगभरात कोरोनाने थैमान घातले असून प्रत्येक सण-उत्सवावर या महामारीचे सावट आले आहे. आता महाराष्ट्रात गणेशोत्सव तोंडावर आहे. प्रत्येक वर्षी गणेशोत्सव मोठ्या धामधुमीत साजरा होतो. कोरोनामुळे यंदा लालबागच्या राजाची प्रतिष्ठापना होणार नाही. त्यामुळे लाल बागच्या राजाचे मुंबईतील वाजत गाजत स्वागत पाहता येणार नाही. परंतु, यंदा गणेशोत्सवाच्या काळात लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ विविध उपक्रम राबवणार आहे. या उपक्रमाचे बॉलिवूडकरांनी स्वागत केले आहे.
लाल बागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी देश-परदेशातून लोक मुंबईत येतात. बॉलिवूड कलाकारदेखील या पवित्र औचित्याने भगवान गणेश यांचे दर्शन घेण्यासाठी येतात. परंतु, यंदा ते दर्शन घेऊ शकणार नाहीत. गणेशोत्सव मंडळाच्या विवध उपक्रम राबवण्याच्या निर्णयाचे बॉलिवूडकरांनी स्वागत केले आहे. रवीना टंडन, रणवीर शौरी, दीया मिर्जा, विक्रांत मैसी यांसारख्या बी-टाऊन स्टार्सनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
दीया मिर्जाने ट्विटमध्ये लिहिले आहे, 'वेळ मोठ्या बदलांना मजबूर करतो. ही #LalbaugchaRaja इको फ्रेंडली बनवण्यासाठी एक विशाल विजयदेखील असेल...'
इतर स्टार्सनी काय म्हटलंय पाहा -