होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबतच्या 'या' क्रमांकावर नोंदवा तक्रारी

जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबतच्या 'या' क्रमांकावर नोंदवा तक्रारी

Last Updated: Mar 30 2020 4:37PM

अन्न व पुरवठा मंत्री  छगन भुजबळमुंबई : पुढारी वृत्तसेवा

कोरोना आजारासंदर्भात सरकारने जाहीर केलेल्या देशव्यापी लॉकडाऊन दरम्यान नागरीकांना रेशन दुकानावर साहित्य न मिळणे, बाजारात वाढीव दराने वस्तूंची विक्री तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत राज्यभरातून अनेक तक्रारी येत आहेत. या प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यालयामार्फत तात्काळ निरसन केले जात आहे.

जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत तसेच इतर कोणत्याही स्वरुपाच्या समस्या भेडसावत असल्यास नागरीकांना सहाय्य मिळवून देण्यासाठी भुजबळ यांचे कार्यालय सदैव तत्पर असून तक्रारदारांनी खालील क्रमांकावर संपर्क साधण्याचे मंत्री कार्यालयाचे आवाहन आहे. तसेच मंत्री कार्यालयामार्फत अशी सुविधा प्रथमच सुरू केली असून नागरिकांचा याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांकडून या सुविधेबाबत समाधान व्यक्त केले जात आहे.

संतोषसिंग परदेशी, खाजगी सचिव- ९८७०३३६५६०
अनिल सोनवणे, विशेष कार्य अधिकारी- ९७६६१५८१११
महेंद्र पवार, विशेष कार्य अधिकारी- ७५८८०५२००३
महेश पैठणकर, स्वीय सहाय्यक- ७८७५२८०९६५