Thu, Sep 24, 2020 16:34होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डोंजामध्ये सचिनची विद्यार्थ्यांसोबत बॅटिंग

डोंजामध्ये सचिनची विद्यार्थ्यांसोबत बॅटिंग

Published On: Dec 20 2017 2:07AM | Last Updated: Dec 20 2017 1:41AM

बुकमार्क करा

परंडा : प्रतिनिधी

तालुक्यातील डोंजा गावात किक्रेटचा देव सचिन तेंडुलकरने मंगळवारी (दि. 19) गावाची पाहणी करून जि. प. शाळेच्या मैदानावर विद्यार्थ्यांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. सचिनच्या चाहत्यांनी मैदान गच्च भरल्याने त्याला मनसोक्‍त फ टकेबाजी करता आली नाही.

भारतरत्न सचिन तेंडुलकरने आदर्श ग्राम योजनेअंतर्गत परंडा तालुक्यातील डोंजा हे गाव दत्तक घेतलेले आहे. त्यामुळे त्याने या गावाची पाहणी करून समस्या जाणून घेतल्या. खासदार सचिन तेंडुलकरचे गावात आगमन होताच ग्रामस्थांचा आनंद व्दिगुणीत झाला. यावेळी सचिनने गावातील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर विद्यार्थ्यांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. तसेच येथील जिल्हा परिषद शाळेस भेट देऊन बांधकामाचीही पाहणी केली़.

शाळेच्या बंद खोलीत काही मोजक्या विद्यार्थ्यांसोबत त्याने संवाद साधून खेळाइतकेच शिक्षणही महत्त्वाचे असल्याचे विद्यार्थ्यांना पटवून सांगून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
ग्रामस्थांशीही सचिनने यावेळी संवाद साधून, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. गावातील पाण्याच्या टाकी, जिल्हा परिषद शाळेची नवीन इमारत, सिमेंट रस्ता कामांचेही त्याच्या हस्ते  उद्घाटन करण्यात आले. गावात त्याच्या स्वागतासाठी उभारलेली वेशीतील भव्य कमान लक्ष वेधून घेत होती.