Wed, Jan 20, 2021 00:25होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोरोना लढाईत 'बीकेटी' टायर्सचीही आघाडी

कोरोना लढाईत 'बीकेटी' टायर्सचीही आघाडी

Last Updated: Jul 10 2020 1:39AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्रासह भारतातील शेतकी तथा औद्योगिक टायर विक्रीत आघाडीची कंपनी असलेल्या बाळकृष्ण इंडस्ट्रिज लिमिटेड तथा बीकेटी टायर्स कंपनीने लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या लोकांना मदत करण्यापासून तर हजारो पीपीई किटस् आणि रुग्णालयीन यंत्रसामुग्री वाटण्यापर्यंत मोठी मदत उभारली आहे.

बीकेटी टायर्सचे सहव्यवस्थापकीय संचालक राजीव पोद्दार यांनी दै. ‘पुढारी’शी संवाद साधताना स्पष्ट केले की, कोरोनाचे संकट गहिरे होताच बीकेटीच्या कर्मचार्‍यांनी एक दिवसाचा पगार देऊन 1 कोटीचा निधी कोरोनाग्रस्तांसाठी उभा केला. बीकेटीचे चेअरमन अरविंद पोद्दार यांनी ही रक्‍कम व्यवस्थापनाच्या वतीने दुप्पट केली आणि त्यातून स्थलांतरित मजुरांसाठी अन्‍नधान्य, वैद्यकीय उपकरणांची खरेदी, कोरोना योद्ध्यांना मदत उभी करण्यात आली.

कोरोना योद्धा म्हणून काम करताना बीकेटीने देशभरातील रुग्णालयांना तब्बल 35 हजार पीपीई किटस्ची मदत केली. पुणे जिल्ह्यात 15 हजार लोकांपर्यंत शिजवलेले अन्‍न रोज पोहोचवले. राज्यात आणि देशात 4 लाख लोकांपर्यंत हे अन्‍न पोहोचवण्यात आले. संपूर्ण लॉकडाऊनच्या काळात शिजवलेल्या अन्‍नाची पाकिटे आणि अन्‍नधान्याची पाकिटे नोकरी  गमावलेल्या मजुरांपर्यंत पोहोचवण्यात आली.  मुंबईतील टाटा रुग्णालयाला 1 कोटी 15 लाख 20 हजार रुपये किमतीचे 12 हेमोडायनॅमिक मॉनिटर्सदेखील बीकेटीने भेट दिले. व्हेंटिलेटर्ससाठी हे मॉनिटर्स अत्यंत आवश्यक असतात. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी त्यांची मदत झाली.

 साखर पट्ट्यामध्ये बीकेटीचे प्राबल्य आहे. सोलापूर, नारायणगाव, जालना, नाशिक आणि नागपूर भागांत वितरणाचे मोठे जाळे असल्याने कोरोना लॉकडाऊनमध्ये सर्वदूर मदत करणे बीकेटीला शक्य झाले. 
- राजीव पोद्दार, सहव्यवस्थापकीय संचालक, बीकेटी टायर्स