Fri, May 29, 2020 00:19होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भाजपचं शिवसेनाच पहिलं प्रेम पण, राष्ट्रवादीशीही संपर्क?

भाजपचं शिवसेनाच पहिलं प्रेम पण, राष्ट्रवादीशीही संपर्क?

Last Updated: Nov 08 2019 2:44PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन डेस्क 

सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी फक्त काही तास शिल्लक असताना महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. त्यातच भाजपच्या एका बड्या नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की जर शिवसेनेचे सहकार्य केले नाही आणि गरज पडलीच तर सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसशीही संपर्क करु, अशा आशयाचे वृत्त टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तसंस्थेने दिले आहे. 

'भाजपच्या नेतृत्वाने स्पष्ट केले आहे की की जर आमच्याकडे बहुमत नसेल तर आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करणार नाही. आम्हाला माहित आहे की आमच्याकडे संख्याबळ नाही. आम्हाला अजूनही आशा आहे की शिवसेना आम्हाला मदत करेल. तसेच 2014 ला राष्ट्रवादीने आम्हाला मदत केली होती. त्यामुळे आम्ही त्यांच्याशीही संपर्क साधू शकतो. जर आम्ही या सर्वांमध्ये अपयशी ठरलो तर सत्ता स्थापनेचा दावा करणे योग्य नाही. आम्हाला तोंडघाशी पडायचे नाही.' असे या भाजप नेत्याने सांगितले. 

तसेच '24 ऑक्टोबरला निकाल आल्यानंतर आम्ही शिवसेनेशी सत्ता स्थापनेसाठी बऱ्याच वेळा संपर्क साधला पण, त्यांच्याकडून युती करण्यासाठी कोणताही प्रतिसाद आला नाही. आम्हाला असे वाटते की 288 पैकी 105 जागा भाजपने जिंकल्या आहेत तर शिवसेनेने 56 जागा त्यामुळे शिवसेनेची मागणी ही व्यवहार्य नाही.' असेही या नेत्याने सांगितले. 

भाजप नेता म्हणाले राज्यपाल सरकार स्थापनेसंदर्भात सगळ्या शक्यता पडताळून पाहतील असा भाजपला विश्वास आहे. प्रथेप्रमाणे ते सगळ्यात मोठ्या पक्षाला सत्ता स्थापनेसाठी पाचारण करतील. त्यानंतर दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या पक्षांना बोलावतील. हे सगळे पर्याय संपल्यानंतर ते राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी प्रस्ताव पाठवतील.