Thu, Aug 06, 2020 04:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भाजप राज्य कार्यकारिणी जाहीर; माधव भंडारी, चंद्रशेखर बावनकुळे, सुरेश हाळवणकरांना संधी

भाजप राज्य कार्यकारिणी जाहीर; माधव भंडारी, चंद्रशेखर बावनकुळे, सुरेश हाळवणकरांना संधी

Last Updated: Jul 03 2020 5:10PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन  

भारतीय जनता पक्षाची नवी राज्य कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या भाधव भंडारी यांची उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे. प्रदेशाध्यक्षपदी  चंद्रकांत पाटील यांच्या सोबतीला १२ उपाध्यक्ष नेमण्यात आले आहेत. पाच जणांची महामंत्रिपदी वर्णी लागली आहे. 

महामंत्रिपदी (संघटन) विजय पुराणिक यांना संधी मिळाली आहे. कोषाध्यक्षपदी मिहीर कोटेचा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंत्री म्हणून १२ जणांची निवड करण्यात आली आहे.