होमपेज › Mumbai-Thane-Raigad › उद्धव ठाकरे ‘मातोश्री’ पुरतेच मुख्यमंत्री, नारायण राणेंचे टीकास्त्र

उद्धव ठाकरे ‘मातोश्री’ पुरतेच मुख्यमंत्री, नारायण राणेंचे टीकास्त्र

Last Updated: Jul 06 2020 4:17PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

मुख्यमंत्री मंत्रालयात फिरकलेच नाहीत, सरकार अस्तित्वात आहे की नाही? पंढरपूरला मुख्यमंत्री गेले मात्र त्यांनी मूर्तीला हात लावला का? हार घातला का? प्रसाद घेतला का? हा वारकरी संप्रदायाचा अपमान आहे, अशा गंभीर आरोप भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

राणे पुढे म्हणाले, मुख्यमंत्री ठाकरे फक्त लॉकडाऊनवरच बोलतात. त्याच्याशिवाय त्यांना दुसरे काहीच बोलता येत नाही. ते जनतेचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले असून त्यांना राज्यातील इतर समस्यांविषयी काहीच देणे घेणे नाही. उद्धव ठाकरे हे मातोश्री पुरते मुख्यमंत्री आहेत. राज्यात सध्या मुख्यमंत्र्यांचे राज्य नसून अधिकारीचे राज्य करत आहेत, अशी टीका केली.

महाराष्ट्रात कोरोनाने असंख्य मृत्यू, त्यामुळेच हे सरकार सत्तेत राहणे योग्य नाही, त्यासाठीच मी राष्ट्रपती राजवटीची मागणी केली होती. जो मुख्यमंत्री मंत्रालयात बसू शकत नाही तो मुख्यमंत्री कशाला हवा, हा मुख्यमंत्री निष्क्रिय आहे, असेही जोरदार टीकास्त्र नारायण राणे यांनी सोडले.