अभिनेता सनी देओल कोरोना पॉझिटिव्ह 

Last Updated: Dec 02 2020 7:53AM
शिमला : पुढारी ऑनलाईन

बॉलिवूड अभिनेते आणि भारतीय जनता पक्षाचे गुरदासपूरचे खासदार सनी देओल (sunny deol corona positive) कोरोना पॉझिटिव्ह  झाले आहेत. हिमाचल प्रदेशच्या आरोग्य सचिवांनी मंगळवारी सनी देओल यांना कोरोना संसर्ग झाल्याची पुष्टी केली.

हिमाचल प्रदेशचे आरोग्य सचिव अमिताभ अवस्थी म्हणाले की, सनी देओल (sunny deol corona positive) गेल्या काही दिवसांपासून कुल्लूमध्ये राहत होते. आरोग्य सचिव अमिताभ यांनी वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले की कुल्लूचे मुख्य वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार सनी देओल आणि त्यांचे मित्र मुंबईला रवाना होण्याच्या विचारात होते, मात्र, मंगळवारी कोरोना विषाणूची लागण झाली असल्याचे दिसून आले. ६४ वर्षीय बॉलिवूड अभिनेता सनी देओल यांची नुकतीच मुंबईत खांद्यावर शस्त्रक्रिया झाली होती. पीटीआयच्या वृत्तानुसार, कुल्लू जिल्ह्यातील मनालीजवळील एका फार्महाऊसमध्ये ते विश्रांतीसाठी गेले होते. 

दरम्यान, गुजरातमधील ( भाजपचे राज्यसभेचे खासदार अभय भारद्वाज यांचे कोरोना विषाणूमुळे निधन झाले. मंगळवारी चेन्नई येथे भाजपचे खासदार भारद्वाज यांचे निधन झाले. कोरोना संसर्ग झाल्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. अभय भारद्वाज यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला आहे.