कसारा : पुढारी वृत्तसेवा
मध्य रेल्वेच्या उंबरमाळी ते कसारा या रेल्वे स्थानकात रात्री १० च्या सुमारास उंबरमाळी स्थानकावरुन रेल्वे गाडी निघाल्यानंतर दोन तरुण दारुच्या नशेत धावत्या ट्रेनमध्ये महिला डब्ब्यात चढले. धावत्या लोकलमध्ये तरुणीवर विनयभंग करत तिला ट्रेनमधून खाली फेकण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कल्याण पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.
अधिक वाचा : पंतप्रधानांकडून पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमधील कोरोना लसीचा आढावा
कसारा येथे राहणार्या एक २१ वर्षीय तरुणी ठाण्यातील एका मॉलमध्ये मोठ्या पदावर कामाला आहे. ही तरुणी दररोज कसारा ते ठाणे दरम्यान लोकलने प्रवास करते. नेहमीप्रमाणे २५ नोव्हेंबरला ही तरुणी ठाण्याहून लोकल ट्रेनच्या महिला डब्ब्यात चढली. त्यावेळी लोकलमध्ये अनेक महिला होत्या. मात्र, उंबरमाळी स्थानकापर्यंत ही ट्रेन रिकामी झाली होती. त्यामुळे त्या लोकलच्या डब्ब्यात ही तरुणी एकटीच होती. यावेळी स्थानकावरुन रेल्वे गाडी निघाल्यानंतर दोन तरुण धावत्या ट्रेनमध्ये चढले. दोघेही दारुच्या नशेत होते. या दोघांचे हावभाव पाहून तरुणी घाबरली. तिने लगचे तिच्या मोबाईलवर दोघांचे फोटो काढले. हे फोटो तिने तिच्या नातेवाईकांना तातडीने पाठविले. या दरम्यान या दोघांनी तरुणीचा छेडछाड करण्यास सुरूवात केली. या तरुणीने शेवटपर्यंत प्रतिकार केला.
अधिक वाचा : औरंगाबाद : पैठण तालुक्यात जुने कावसानमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची हत्या
यानंतर काही मिनिटांत कसारा रेल्वे स्थानक येणार असल्याचे लक्षात येताच त्या दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, सदर तरुणीने हिम्मत करीत एका आरोपी पकडून ठेवले. या झटापटीत तिला चालत्या ट्रेनमधून फेकून देण्याचा प्रयत्नही झाला. परंतु, तोपर्यंत कसारा स्थानक आले. कसारा स्थानकात गाडी येताच सदर तरुणीने एका तरुणास नातेवाईकांच्या मदतीने पोलिसांच्या ताब्यात दिले. दुसर्या आरोपीला पोलिसांनी ठाणे येथून अटक केली. अमोल जाधव आणि अमन हिले अशी या आरोपींची नाव आहेत. हे दोन्ही तरुण ठाणे येथे कामाला असल्याचे पोलिसांना समजते. या प्रकरणी कल्याण पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.