Sun, Jan 17, 2021 05:09
गणेश नाईक -मंदा म्हात्रेंचे शीतयुद्ध थांबणार? आशीष शेलार नवी मुंबईत

Last Updated: Jan 13 2021 3:35PM
नवी  मुंबई : पुढारी वृतसेवा 

भाजप नेते आणि नवी मुंबईचे प्रभारी आशिष शेलार यांच्यावर पक्षाने नवीन जबाबदारी दिली आहे. त्यांच्यावर पक्षांतर्गत सुरू असणारी धुसपूस आणि स्थानिक आमदार आणि नगरसेवकांमध्ये असलेले मतभेद मिटविण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. (Ashish Shelar has been given the responsibility of resolving the differences between the MLAs and the corporators)

विधानसभा निवडणुकींपूर्वी राष्ट्रवादीतून आलेले दिग्गज नेते गणेश नाईक यांच्यासोबत मंदा म्हात्रे यांचे सुरू असलेले शीतयुद्ध थांबविण्याची जबाबदारीही शेलारांवर सोपविण्यात आली आहे. या झालेल्या पक्षातंर्गत बदलामुळे पक्षातील गळती रोखण्यासाठी भाजप नेते सरसावले आहेत, असे या दौऱ्यावरून स्पष्ट होत आहे.  

वाचा : धनंजय मुंडेंवर कारवाई होऊ शकते का? कायदेशीर प्रक्रिया काय सांगते

राज्यात होऊ घातलेल्या निवडणुकीच्या तोंडावर पक्षा अंतर्गत मतभेद मिटवण्यासाठी भाजपची जोरदार फील्डिंग सुरु असल्याचे दिसत आहे. त्याच अनुषंगाने नवी मुंबईतील भाजप आमदार आणि नगरसेवकांमध्ये असलेले मतभेदही समोर येत आहेत. हे मतभेद मिटविण्याची जबाबदारी आशिष शेलार यांच्यावर आली आहे. त्याप्रमाणे शेलार यांनी आज नवी मुंबईतील आ. मंदा म्हात्रे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी भाजपच्या माजी नगरसेवकांची ही भेट घेऊन महापालिका निवडणुकीच्या संदर्भात चर्चा केली. यावेळी राजकीय घडामोडी आणि पक्षबदलाचे वारे आदींवर चर्चा केली. 

वाचा : नवाब मलिकांच्या जावयाला एनसीबीचे समन्स

दरम्यान मार्च, एप्रिलमध्ये राज्यातील अनेक महापालिकांच्या निवडणुका आहेत. त्या पार्श्वभुमीवर नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत भाजपच्या माजी नगरसेवकांचे इनकमिंग सुरू झाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर गेल्या आठवड्यात भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या बैठकीत आमदार आशिष शेलार यांच्यावर निवडणुकींच्या संदर्भात जबाबदारी सोपविण्यात आली. शेलार यांची ही निवडणूक संदर्भातील पहिलीच आढावा बैठक असून राजकीय मतभेद मिटविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. 

वाचा : मुडेंशी नाव जोडल्या गेलेल्या करूणा शर्मा सामाजिक कार्यात आघाडीवर...

यावेळी शेलार आणि म्हात्रे या दोघांमध्ये आगामी निवडणुकांसंदर्भात जवळपास एक तास चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. निवडणूक प्रभारी येणार म्हणून मंदा म्हात्रेंच्या बंगल्यावर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. यावेळी मतभेद मिटविण्यासाठी शेलारांनी स्थानिक नेते आणि नगरसेवकांशीही चर्चा केली. तसेच यावेळी अनेक महत्वाच्या विषयावर राजकीय चर्चा झाली.