Wed, May 12, 2021 01:26
सचिन वाझे प्रकरणात आणखी एक अधिकारी अटकेत

Last Updated: Apr 23 2021 12:56PM

मुंबई : पुढारी ऑनलाईन

उद्योपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या घरासमोर जिलेटिंनच्या कांड्या असलेली कार ठेवणे आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एनआयएने मुंबई पोलिस दलातील सुनील माने या अधिकाऱ्याला शुक्रवारी अटक केली. संबधित अधिकाऱ्याला गुरुवारी रात्री चौकशीसाठी बोलविले होते. माने हे मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ११मधील पोलीस निरीक्षक आहेत.

वाचा : पंतप्रधान मोदी यांच्यासोबत मुख्यमंत्री ठाकरेंची बैठक सुरू

अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सहभाग असल्याच्या आरोपांवरून सुनील माने यांना राष्ट्रीय तपास संस्थेने गुरुवारी चौकशीसाठी बोलावले होते. या प्रकरणात त्यांचा सहभाग झाल्याने माने यांना शुक्रवारी अटक करण्यात आली. आज माने यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. याआधी  एनआयएने सचिन वाझे, रियाझ काझी याच्यासह चार जणांना अटक केली होती.

वाचा : देशात हाहाकार सुरुच, सलग दुसऱ्या दिवशी तीन लाखांवर रुग्ण, २,२६३ मृत्यू

अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके ठेवल्याच्या प्रकरणानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडली होती. या प्रकरणातील मनसुख हिरेन याचा मृत्यू झाला असून त्याचा तपास सुरू आहे. या प्रकरणात प्रमुख संशयित म्हणून गुन्हे शाखेतील सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे याला अटक करण्यात आली आहे. तसेच अन्य एका पोलिस कर्मचाऱ्यासह बडतर्फ पोलिसांचाही समावेश आहे. या प्रकरणानंतर मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी केली तर त्यानंतर अनिल देशमुख यांनाही गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. 

वाचा : विरारमध्ये दोन तास अग्नितांडव, आयसीयूमधील १७ पैकी १३ रुग्ण होरपळले! नेमकं काय घडलं?