Thu, Sep 24, 2020 17:18होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यात आणखी २३१ पोलिसांना कोरोनाची लागण

राज्यात आणखी २३१ पोलिसांना कोरोनाची लागण

Last Updated: Aug 05 2020 1:17AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

राज्य पोलीस दलावरील कोरोनाचे संकट वाढतच असून गेल्या चोवीस तासात एका अधिकार्‍यासह दोन अंमलदारांचा मृत्यू झाला आहे. तर, आणखी 231 पोलिसांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पोलीस दलाची चिंता आणखीनच वाढली आहे.

कोरोनासंबंधी प्रशासनाकडून देण्यात आलेली सर्व प्रकारची कर्तव्ये बजावत असताना पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना मोठ्याप्रमाणात या रोगाची लागण झाली आहे. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त पोलिसांचा आकडा वाढतच जात असून गेल्या चोवीस तासात आणखी 231 पोलिसांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्हआला आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्त पोलिसांचा आकडा 9 हजार 933 वर पोहचला आहे. यात 1 हजार 25 अधिकारी आणि 8 हजार 909 अंमलदारांचा समावेश आहे.

कोरोनाची लागण झालेल्या 794 अधिकार्‍यांसह 7 हजार 156 अंमलदार अशा 7 हजार 950 पोलिसांनी या रोगांवर मात करून ते कोरोना मुक्त झाले आहेत. मात्र या रोगावर उपचार घेत असलेल्या पोलिसांपैकी 01 अधिकारी आणि 02 अंमलदारांचा गेल्या चोवीस तासात मृत्यू झाला आहे. त्यामुळे पोलीस मृतांची संख्या 107 झाली आहे. तर, 221 अधिकारी आणि 1 हजार 656 अंमलदार अशा एकूण 1 हजार 877 पोलिसांवर अद्यापही उपचार सुरू असल्याची माहिती राज्य पोलीस मुख्यालयाने दिली. 

 "