होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अंधेरी आग : शेजाऱ्यांना वाचवताना गमावले कुटुंब

अंधेरी आग : शेजाऱ्यांना वाचवताना गमावले कुटुंब

Published On: Jan 05 2018 2:01AM | Last Updated: Jan 05 2018 8:50AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

कमला मिल आग दुर्घटनेला आठवडाही उलटला नसताना पुन्हा मुंबईत वर्षाच्या सुरुवातीस आगीची दुसरी दुर्दैवी घटना घडली. अंधेरी पूर्वेतील शिवाजी नगरमधील मेमून मेन्शन या निवासी इमारतीला बुधवारी मध्यरात्री अचानक आग लागली आणि त्यात एकाच कुटुंबातील चौघांचे बळी गेले.

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाचपुन्हा एकदा आग लागल्याची घटना घडल्यानेमुंबईकरांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.बुधवारी मध्यरात्री 12.50 वाजण्याच्या आसपास अब्बास कपासी यांच्या घरातल्या एसीनेपेट घेतला. धूर आल्याचे लक्षात येताच शेजार्‍यापाजार्‍यांनी खाली उतरावे यासाठी कपासी दरवाजा उघडून शेजार्‍यांना सांगायला गेले. अब्बास घराबाहेर पडताच त्यांच्या स्वतःच्या घराचा दरवाजा बंद झाला आणि तोही कायमचा. दरवाजा उघडण्याचा अतोनात प्रयत्न केला, दरवाजा तुटला मात्र सगळंच व्यर्थ. आगीने घरात पेट घेतला आणि घरात असणार्‍या चारही व्यक्तींचा बळी घेतला.

या आगीत दाऊद अली कपासी (80) तसेच अब्बास यांची पत्नी तस्लीम कपासी (42) व मुलेसकीना(14), मोहसीन(10) यांचा दुर्दैवी मृत्यूझाला. या घटनेमुळे अब्बास यांना मोठा धक्काच बसला आहे. प्रत्यक्षदर्शी जॉन पिंटोम्हणाले की, रात्री 12 वाजता लाईट गेले. लाईट आल्यानंतर तिसर्‍या मजल्यावरील अब्बास यांच्या घरातील एसीने पेट घेतला. धुर येऊ लागल्याने त्यांनी आरडाओरडा केला. खाली उतरा असे सांगण्यासाठी अब्बास दरवाजा उघडून शेजार्‍यांचे दार ठोकायला गेले पण त्यांच्या घरचा दरवाजा बंद झाला. अनेक प्रयत्नांनंतरही दरवाजा उघडला नाही. दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. दरवाजा उघडला पण तरीही ते बाहेर येऊ शकले नाही. घरात आई, पत्नी व दोन लहान मुले होती.

घरात थांबलो म्हणून वाचलो

घरी थांबलो म्हणून वाचलो नाहीतर आमचा देखील मृत्यू झाला असता, हे शब्द आहेत अंधेरीच्या आगीत अडकूनही सुखरूप असलेल्या हुजैफा कोठारी यांचे. मुंबईतल्या अंधेरी पूर्व भागातील महमूद इमारतीत रात्री 12.50च्या सुमारास आग लागली. या इमारतीत राहणारे कोठारी कुटुंब आगीच्या विळख्यातून सुदैवाने वाचले. आग लागली असताना देखील घाई न करता संपूर्ण कोठारी कुटुंबीय घरातचं थांबले आणि अनर्थटळला.

हुजैफा कोठारी म्हणाला की, आग लगी है असा आवाज आल्यावर खिडकीतून बाहेर पाहिले तेव्हा लोक पळत होते. आग लागली. तुम्हीही बाहेर पडा असे लोकं सांगत होते. जीव वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतानात घाई करू नये असा विचार मनात आला दरवाजा उघडून पळण्यापेक्षा घरीच थांबण्याचा निर्णय घेतला. अखेर 4च्या सुमारास अग्निशमन दलाच्या जवानांनी आम्हाला बाहेर काढले.