Wed, Jan 20, 2021 22:06ब्रेकिंग : आनंदवनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल आमटे यांची आत्महत्या

Last Updated: Nov 30 2020 1:56PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

आनंदवनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल आमटे-करजगी यांनी आत्महत्या केली आहे. शीतल आमटे या बाबा आमटे यांच्या नात आणि डॉ. विकास आमटे यांच्या कन्या आहेत. शीतल आमटे यांनी झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे.  त्यांना वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता त्यांना मृत घोषित करण्यात आलं. त्या प्रचंड तणावाखाली सुद्धा होत्या असेही बोलले जात आहे. 

शीतल आमटे यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. त्यामध्ये आनंदवनातील कार्यकर्ते तसेच आमटे कुटुंबातील सदस्यांवर गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यामध्ये करण्यात आलेल्या आरोपांशी अजिबात सहमत नसल्याचे व ते तथ्यहीन असल्याचे निवेदन आमटे कुटुंबातर्फे जारी करण्यात आले होते.

डॉ. विकास, डॉ. प्रकाश, डॉ. भारती व डॉ. मंदाकिनी आमटे यांची स्वाक्षरी असलेल्या या निवेदनात डॉ. शीतल (पूर्वाश्रमीच्या डॉ. शीतल विकास आमटे) या सध्या मानसिक ताण व नैराश्याचा सामना करीत असल्याची स्पष्ट कबुली देण्यात आली होती.