Mon, Aug 10, 2020 05:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महानायक अमिताभ बच्चन यांच्याकडून रुग्णालयातून स्पेशल संदेश! (video)

महानायक अमिताभ बच्चन यांच्याकडून रुग्णालयातून स्पेशल संदेश! (video)

Last Updated: Jul 12 2020 4:43PM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना शनिवारी नानावाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर लाखो चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला. सिनेजगतही सुन्न झाले.नावावटी रुग्णालयात दाखल असलेल्या अमिताभ बच्चन यांनी रुग्णालयातूनच आपल्या चाहत्यांसाठी, देशवासियांसाठी आणि देशात कोरोनाशी लढा देण्यात सर्वात महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या डॉक्टर, नर्स आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांसाठी एक व्हिडिओ संदेश दिला. यामध्ये नानावटी रुग्णालायत मिळत असलेल्या ट्रीटमेंटबद्दल आणि तिथल्या डॉक्टर-नर्सेसचे त्‍यांनी कौतुक केले. 

अधिक वाचा : ब्रेकिंग! बच्चन घराण्यात कोरोनाचा शिरकाव; ऐश्वर्या आणि मुलगी आराध्याही पॉझिटिव्ह

नानावटी हॉस्पिटलमधले डॉक्टर आणि नर्स या काळात अतिशय उत्तम काम करत आहेत. सध्या मंदिर बंद आहेत, मात्र सगळ्या रुग्णालयांमध्ये जितके डॉक्टर आणि नर्स काम करत आहेत, ते सर्व जणू देवाचे रुप आहेत. यावेळी त्‍यांनी तुम्‍ही जीवदानाचे काम करत आहात. त्यापुढे मी तुम्हा सगळ्यांसमोर नतमस्तक असल्याचे बच्चन म्हणाले.

अधिक वाचा : 'एन्काउंटर करतील हवाई मार्गेच कानपूरला न्या' (video)

हे दिवस फार कठीण आहेत. सगळ्यांच्या सहनशीलतेच्या कसोटीचा हा काळ आहे. पण माझी सगळ्यांना विनंती आहे की कुणीही घाबरून जाऊ नका. गोंधळून जाऊ नका. आपण या सगळ्या युद्धात सोबत आहोत. आपण आशा करूयात की लवकर आपण या परिस्थितीतून बाहेर पडू. मला मिळत असलेल्या उपचारांसाठी मी नानावटी हॉस्पिटलच्या सर्व कर्मचारी, डॉक्टर आणि नर्सचे आभार त्यांनी व्हिडिओतून व्यक्त केले.