Sat, Jan 23, 2021 05:47होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जे 'नासा'ला जमले नाही ते ठाणेकर अक्षतने केले!

जे 'नासा'ला जमले नाही ते ठाणेकर अक्षतने केले!

Published On: May 05 2018 1:36AM | Last Updated: May 05 2018 11:30AMठाणे : विशेष प्रतिनिधी

आतापर्यंत नासाच्या शास्त्रज्ञांना जे जमले नाही ती किमया अकरावीमध्ये शिकणार्‍या अक्षत मोहिते या ठाणेकर विद्यार्थ्याने करून दाखवले. पृथ्वी ग्रहाच्या बाहेर तब्बल 20 हजार लोक पृथ्वीसारख्याच चांगल्या वातावरणात राहतील, असे मशिन अक्षतने तयार केले असून या संशोधनाची दखल घेत नासाने अमेरिकेत होणार्‍या 2018 च्या इंटरनॅशनल स्पेश डेव्हलपमेंट कॉन्फरन्ससाठी अक्षतला आमंत्रित केले आहे. 

रायगड जिल्ह्याच्या मानगांव तालुक्यातील भालेगावचा असलेला अक्षत मोहिते हा ठाण्यातील घोडबंदर रोडच्या विजय नगरीमध्ये राहतो. त्याने आनंदनगर आर्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये शालेय शिक्षण घेतले असून मुलुंडच्या होली ऐंजल हायस्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये सध्या तो बारावी विज्ञान शिकतोय. अक्षतला नासाच्या स्पेस सेटलमेंटच्या संशोधनाची माहिती मिळाल्यानंतर अक्षतने पृथ्वीच्या वातावरणाबाहेर किमान 20 हजार लोक राहू शकतील,  असे स्पेस मशिन तयार केले. दैनिक पुढारीला त्याने सांगितले की, हे मशिन अवघ्या दहा दिवसांत तयर केले. त्यासाठी विशिष्ट सॉफ्टएवर वापरण्यात आले. अलिबागमधील नासाचे प्रतिनिधी असलेले प्रणीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले आहे आणि नॅशनल स्पेस सोसायटी आयोजित स्पेस सेटलमेंट कॉन्टेस्ट या स्पर्धेत या मशिनची निवडही  झाली. 

आतापर्यंत पृथ्वीग्रहाबाहेर फक्त सहा जण राहतील एवढ्याच क्षमतेचे स्पेस मशिन तयार होऊ शकले आहे. ही क्षमता तब्बल 20 हजार लोकांपर्यंत वाढवण्याचे मोठे काम अक्षतने केले.  या मशिनद्वारे 20 हजार लोक पृथ्वीबाहेरच्या वातावरणात अतिशय व्यवस्थित व  प्रदुषणमुक्त जगू शकतील. हे संशोधन गेल्या 15 फेब्रुवारीला नासा सेंटरकडे पाठविण्यात आले. 16 मार्चरोजी माझ्या संशोधनासाठी निवड झाल्याचे नासाकडून कळविण्यात आले आणि इंटरनॅशनल स्पेस डेव्हलपमेंट कॉन्फरन्ससाठी आमंत्रणही मिळाले, हे सांगताना अक्षतचा आनंद अवकाशात मावत नव्हता.आता होऊ घातलेल्या स्पर्धेत असे स्पेस मशिन  प्रत्यक्षात तयार करावे लागणार असून अक्षत मोहिते 20 मे रोजी अमेरिकेला रवाना होणार आहे. अक्षतचा गुरुवारी युवासेनाप्रमुख आदित्य  ठाकरे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. यावेळी ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक उपस्थित होते. अक्षतच्या अमेरिकेला जाण्या-येण्यापासूनचा सर्व खर्च शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी उचलला आहे. 

अवघ्या दहा दिवसांमध्ये 20 हजार लोक क्षमतेचे स्पेस मशिन संशोधित करण्यासाठी पहाटे 3 वाजेपर्यंत काम करावे लागत होते. सततच्या जागरणामुळे कॉलेजला उशिरा जाणे, कधी कधी दांडी मारावी लागली. तरी देखील कॉलेजने मला सांभाळून घेतले. 

Tags : Mumbai, Akshats, space, machine, likes, NASA