Sun, Sep 20, 2020 07:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अजितदादांना मुख्यमंत्रीपदी बघायचं आहे; रक्षाबंधन दिनी ताईंची इच्छा

अजितदादांना मुख्यमंत्रीपदी बघायचं आहे; रक्षाबंधन दिनी ताईंची इच्छा

Last Updated: Aug 03 2020 1:54PM

उपमुख्यमंत्री अजित पवारमुंबई : पुढारी ऑनलाईन

आज राज्यात रक्षाबंधनाचा सण साजरा होत आहे. बहीण-भावातील अतूट नात्याचा धागा आणखी घट्ट करणारा हा सण. आज या दिवशी बहिण आपल्या भावाकडे काहीतरी मागत असते. या निमित्ताने राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहिणीने आपल्या मनातील एक इच्छा बोलून दाखविली आहे. साहेबांना (शरद पवार) पंतप्रधानपदी आणि अजित पवार अर्थात दादांना मुख्यमंत्रीपदी बघायचं आहे, अशी इच्छा अजित पवार यांची बहीण डॉ. रजनी इंदुलकर यांनी व्यक्त केली आहे. एका दैनिकाशी बोलताना त्यांनी ही आमच्या सर्वांच्या मनातील इच्छा पूर्ण व्हावी, अशी आशा व्यक्त केली आहे.

वाचा : 'अजित पवार यांच्यासोबत सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न फसलेला'

दादांना मुख्यमंत्रीपदी बघायचे आहे, अशी आमची इच्छा असून ती एक दिवस पूर्ण व्हावी, असे डॉ. रजनी इंदुलकर यांनी म्हटले आहे. लहानपणी दादा खूप लाजाळू होते. ते हळवे आहेत, अशा काही त्यांच्या आठवणी त्यांनी सांगितल्या आहेत. 

वाचा : वाढदिवस सीएम उद्धव ठाकरेंचा; चर्चा अजित पवारांनी दिलेल्या शुभेच्छांची आणि टायमिंगची!

दरम्यान, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील आज आपले भाऊ अजित पवार यांना राखी बांधली. त्यांनी रक्षाबंधनचा व्हिडिओ सोशल मीडियावरुन शेअर केला आहे. ''बहीण-भावातील नात्याचे बंध आणखी घट्ट करणारा सण, राखी पौर्णिमा. यानिमित्ताने माझे भाऊ अजित दादा यांचे औक्षण करुन त्यांना राखी बांधली'' असे सुप्रिया सुळे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. 


 

 "