Fri, Oct 30, 2020 18:11होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ऐश्वर्या राय आणि जया बच्चन यांचा कोरोना अहवाल आला

ऐश्वर्या राय आणि जया बच्चन यांचा कोरोना अहवाल आला

Last Updated: Jul 12 2020 8:32AM

संग्रहित छायाचित्रमुंबई : पुढारी ऑनलाईन

बीग बी अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याचे त्यांनी सांगीतले. त्यांच्याबरोबर अभिषेक बच्चन यांना ही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, बच्चन कुटुंबातील ऐश्वर्या राय बच्चन, जया बच्चन या दोघींचा करोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याचे स्पष्ट झाले आहे. 

अधिक वाचा :  अमिताभ, अभिषेक बच्चन कोरोनाबाधित

अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन या दोघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर त्यांना उपचारासाठी नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमीताभ बच्चन यांच्या डॉक्टरांनी अमिताभ यांची तब्बेत ठीक असल्याचे सांगीतले. या दोघांनीही त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन सांगितले. अभिषेक बच्चन यांची मुलगी अराध्या हिचा कोरोना अहवाल स्पष्ट करण्यात आलेला नाही.

 "