Fri, Sep 18, 2020 22:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भाजप खासदार हेमा मालिनींकडून समाजवादी पक्षाच्या जया बच्चन यांची पाठराखण कशासाठी?

हेमा मालिनींकडून जया बच्चन यांची पाठराखण

Last Updated: Sep 16 2020 12:44PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने केलेल्या आत्महत्येनंतर बॉलिवुडमधील अनेक काळ्या कृत्यांवर पडला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून दररोज नववीन खुलासे होत आहेत. बॉलिवुडच्या नशेबाजीवरही मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. त्यामुळे या मुद्यावर  संसदेच्या पावसाळी अधिवेशनात गोरखपूरचे खासदार अभिनेते रवी किशन यांनी लोकसभेत आवाज उठवला होता. 

त्यांनी बॉलिवूडमध्ये ड्रग्जचं वाढतं प्रमाणावर चिंता व्यक्त केली होती. यानंतर समाजवादी पार्टीच्या राज्यसभा खासदार जया बच्चन यांनी रवी किशन यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेताना  बॉलिवूडला बदनाम केलं जात असल्याचा आरोप केला. काही लोकांनी मनोरंजन क्षेत्राला बदनाम केल्याचेही त्या म्हणाल्या. अभिनेत्री आणि मथुरेच्या खासदार हेमा मालिनी यांनी आता जया बच्चन यांची पाठराखण केली आहे.

हेमा मालिनी यांनी म्हटलं आहे की, फक्त बॉलिवूडमधील ड्रग्ज वापरावरच का चर्चा होत आहे? अनेक ठिकाणे आहेत ज्या ठिकाणी ड्रग्जचा वापर होतो.जगातही उपयोग केला जातो. याचा अर्थ असा नाही की संपूर्ण बॉलिवुड खराब आहे. ज्या पद्धतीने लोक बॉलिवूडवर आरोप करत आहेत, ते चुकीचे आहे. 
 

 "