Wed, Jan 20, 2021 21:58
बीएमसीने सराईत गुन्हेगार म्हटलेल्या सोनू सूदने घेतली शरद पवारांची भेट

Last Updated: Jan 13 2021 10:52AM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

अभिनेता सोनू सूद याने आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. अद्याप या भेटीमागचे कारण स्पष्ट झाले नसले तरी ही सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या भेटीमुळे सर्वत्र चर्चेचा सूर उमटत आहे. (Sonu sood paid courtsey visit to NCP chief Sharad pawar )

सध्या मुंबई महापालिका आणि सोनू सूद यांच्यात अनधिकृत हॉटेल वरून वाद सुरु आहे. सध्या मुंबई उच्च न्यायालयात याची सुनावणी सुरु आहे. न्यायालयाने या प्रकरणी १३ जानेवारी म्हणजे आजपर्यंत स्थगिती कारवाईस स्थगिती दिली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याने राजकीय तसेच मनोरंजनसृष्टीमध्ये चर्चेला ऊत आला आहे.