Thu, Aug 06, 2020 04:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बावीस दिवसांत पुन्हा मिसाळांची बदली, नवी मुंबई महापालिका आयुक्तपदी अभिजित बांगर 

बावीस दिवसांत पुन्हा मिसाळांची बदली, नवी मुंबई महापालिका आयुक्तपदी अभिजित बांगर 

Last Updated: Jul 14 2020 2:17PM

संग्रहित छायाचित्रनवी मुंबई : पुढारी वृतसेवा 

नवी मुंबई महापालिका आयुक्त आण्णा साहेब मिसाळ यांची राज्य सरकारने २३ जून रोजी बदली केली होती. आता पुन्हा त्यांची बदली केली आहे. नवे आयुक्त म्हणून अभिजित बांगर यांची निवड केली असून त्यांनी पदभार घेतला. गेल्या महिन्यात २४ तासांत मिसाळ यांच्या बदलीला स्थगिती दिली होती. आज २२ दिवसानंतर मिसाळ यांच्या बदली स्थगितीचे आदेश उठवत राज्य सरकारने त्यांची बदली केली आहे. त्यांच्या जागी अभिजित बांगर यांना पाठवले आहे.

वाचा : देश कोरोना संकटाशी झुंजत असताना सरकार पाडण्याचे भाजपकडून उपद्व्याप- शिवसेना

बांगर हे २००८ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. आतापर्यंत बांगार यांनी अमरावती, पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, नागपूर महापालिका आयुक्त आणि वस्त्रोद्योग विभागात संचालक पदी पदभार काम केले आहे. 

नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात मिसाळ यांना अपयश आल्याचा ठपका ठेवत त्यांची बदली केल्याची चर्चा महापालिकेत सुरू आहे.  मात्र २३ जूनला स्थगिती दिल्यानंतर याबाबतची कुणकुण मिसाळ यांना नक्कीच असेल. केवळ तडकाफडकी बदली होणे आणि २२ दिवसानंतर बदली होणे, यामध्ये मोठा फरक आहे. सध्या त्यांना कुठलाच विभाग दिला नसल्याचे समजते.

अभिजीत बांगर हे मुळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथील असून अनेक वर्षे त्यांचे वास्तव्य बार्शी येथे होते. त्यांनी पुणे येथे अर्थशास्त्र या विषयात एम. ए. केले आहे. काही काळ तेथील गोखले इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक म्हणून काम केले आहे. बांगर २००८ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.

अमरावती आणि पालघर या आदिवासीबहुल जिल्ह्याचा जिल्हाधिकारी असताना तेथील कुपोषणाचा प्रश्न सोडविण्यासाठी बांगर यांनी  प्राधान्य दिले. तिथे काम करताना ही समस्या समजून घेणे उपाय आखणे, त्याची अंमलबजावणी करणे या कामांचा दांडगा अनुभव त्यांना मिळाला. अमरावती जिल्ह्यात मेळघाटातील कुपोषणाचा प्रश्न सोडविण्यास त्यांनी प्राधान्य दिले. पालघर जिल्ह्याची स्थापना झाल्यानंतर पहिला जिल्हाधिकारी म्हणून अभिजित बांगर यांची वर्णी लागली होती. त्यावेळी  काम करताना सर्वात महत्त्वाचे आव्हान कुपोषणाचे होते. त्यावेळी त्यांना कुपोषणाची समस्या जवळून पाहता आली होती. अमरावतीचा जिल्हाधिकारी असतानाही मेळघाटातील कुपोषणाच्या समस्या संबंधित इतर बाबींचा प्राधान्याने त्यांनी कुपोषण रोखण्यासाठी प्रयत्न केले होते.

बांगर हे नागपूर येथे जिल्हा सहायक अधिकारी, रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी म्हणून काम केले. त्याचप्रमाणे, त्यांनी रायगड सातारा येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून प्रत्येकी दोन वर्षे काम केले आहे.

वाचा : कोरेगाव भीमा प्रकरण : वरवरा राव रुग्णालयात दाखल