Thu, Jan 21, 2021 01:43होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईला एसी लोकलची नाताळ भेट! (व्हिडिओ)

मुंबईला एसी लोकलची नाताळ भेट! (व्हिडिओ)

Published On: Dec 25 2017 1:42AM | Last Updated: Dec 25 2017 11:25AM

बुकमार्क करा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

प्रचंड उकाड्याने नेहमीच त्रस्त असणार्‍या मुंबईकरांसाठी ‘लोकल’  थंडावा मिळाला असून बोरिवली ते चर्चगेट या पहिल्या एसी लोकलचा प्रारंभ सोमवारी झाला. या लोकलची शेवटची तांत्रिक चाचणी रविवारी घेण्यात आली. 1 जानेवारीपासून चर्चगेट ते विरार ही दुसरी एसी लोकल सुरू केली जाणार आहे. दिवसभरात या लोकलच्या 12 फेर्‍या होतील. यापूर्वीच्या 12 नॉन-एसी ट्रेनच्या जागी ही नवीन सेवा सुरू करण्यात आली आहे.

मुंबईतील पहिलीवहिली वातानुकूलित लोकल (एसी लोकल) प्रत्यक्षात सेवेत येण्याची मुंबईकरांची प्रतीक्षा आता संपली आहे. रेल्वे मंत्रालयाने मुंबईकरांना नाताळची भेट दिली असून भारतीय बनावटीच्या या एसी लोकलचा किमान तिकीट दर 60 रुपये असून, कमाल भाडे 200 रुपये राहणार आहे. सोमवारी सकाळी प्रसारमाध्यमांना घेऊन ही लोकल 10.30 वाजता बोरिवली स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 9 व 10 वरून चर्चगेटसाठी रवाना होणार आहे. 

दशकभराच्या प्रतीक्षेनंतर मुंबईकरांना वातानुकूलित लोकल प्रवासाची प्रत्यक्ष अनुभूती घेता येणार आहे. चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये (आयसीएफ) ही एसी लोकल तयार करण्यात आली आहे. रेल्वे बोर्डापाठोपाठ पश्चिम रेल्वेच्या मुख्य सुरक्षा आयुक्तांनी सुरक्षिततेबाबतचे प्रमाणपत्र दिल्यानंतर ही लोकल सेवेत येण्यावर शिक्कामोर्तब झाले. प्रीमियम दर्जाचा स्तर लाभलेल्या एसी लोकलचे प्रवासभाडे कमीत कमी 60 रुपये ते जास्तीत जास्त 200 रुपयांपर्यंत असेल.