कोल्हापूरनंतर पालघरमध्येही आदिवासी महिलेची वाटेतच झाली प्रसूती, बालकाचा मृत्यू, मातेची मृत्यूशी झुंज 

Last Updated: Nov 28 2020 6:49PM
Responsive image


जव्हार : तुळशीराम चौधरी 

मोखाड्यातील आमले गावातील गरोदर मातेला वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्याने मातेचा व बालकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, जव्हार तालुक्यात पिपंळशेत खरोंडा (हुंबरन) गावातील आदिवासी महिलेला प्रसूतीसाठी झोळीतून नेताना महिलेची जंगलातील पायवाटेत प्रसूती झाली. मात्र वेळेत उपचारांअभावी बालकाचा मृत्यू झाला असून मातेची ग्रामीण रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू आहे. ही हृदयद्रावक घटना जव्हार तालुक्यातील पिपंळशेत खरोंडा (हुंबरन) गावात घडली आहे.

अर्थव्यवस्था संकटातून सावरतेय; तांत्रिक मंदीला काहीही अर्थ नाही : नीती आयोग

जव्हार तालुक्यातील पिपंळशेत खरोंडा (हुंबरन) येथील कल्पना राजू रावते (वय २४) या गरोदर मातेला शुक्रवारी ३ वाजण्याच्या दरम्यान प्रस्तुतीवेदना सुरू झाल्या. त्यानंतर तिला पिंपळशेत येथील आरोग्य पथकातील दवाखान्यात नेण्यासाठी गाडीची व्यावस्था करण्यासाठी तीचे पती हे पायी चालत हद्दीवर असलेल्या डहाणू तालुक्यातील किन्हवली गावात गेले. परंतु खासगी जीप मिळाली नाही. तसेच त्याच्या जवळ गाडीचे भाडे द्यायला पैसे नसल्याने, तात्काळ जीप, अन्य खासगी गाडी  उपलब्ध झाली नाही. त्या गरोदर मातेच्या पतीला घरी परतांना उशीर झाला. तोपर्यंत पत्नी कल्पनाला प्रसूतीच्या अधिक वेदना होत असतांना, गाडी मिळण्यासाठी पतीची धावपळ सुरू होती. मात्र जीप, अन्य खासगी वाहन मिळाले नाही.

अखेर हुंबरन गावातील ग्रामस्थांनी त्या  गरोदर मातेला प्रसूतीच्या वेदना होत असताना, डोलीत बसता येणे शक्य नसल्याने झोळीत नेण्याचे ठरवले. पण जंगलातील पायवाटेतच त्या महिलेला प्रसूतीच्या वेदना सुरू होवून तिची जंगलातच प्रसूती झाली. 

मुख्यमंत्रिपदाला शोभेल असे वागा; देवेंद्र फडणवीसांचा सीएम ठाकरेंना सल्ला

दरम्यान तेथे कोणतेच उपचारांची सुविधा नसल्याने बाळाचा जागीच मृत्यू झाला. बाळाचा जागीच मृत्यू झाला म्हणून रडत न बसता ग्रामस्थांनी  मातेला आणि मृत बाळाला पिंपळशेत येथील आरोग्य पथकापर्यंत झोळीत बांधून पोहोचवले. परंतु त्या मातेची प्रकृती अधिक गंभीर असल्याने  तिला रात्री १० वाजण्याच्या सुमारास जव्हार येथील ग्रामीण रुग्णलयात दाखल केले  असून  रुग्णालयात तिची मृत्यूशी झुंज सुरू आहे. 

प्राथमिक उपचार मिळत नाही

पिपंळशेत खरोंडा ग्रामपंचायत येथे आरोग्यपथक असूनही उपयोगाचे नाही, त्या ठिकाणी रुग्णवाहिका नाही, येथे स्थानिक आरोग्य केंद्रात वेळेत आरोग्य अधिकारी उपस्थित राहत नाही. त्यामुळे प्राथमिक उपचार मिळत नाही. त्यातच कर्मचारीही कमी, असा अनेक आरोग्यविषयक समस्या असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. 

रुग्णवाहिका वेळेत मिळाली नसल्यानेच बाळाचा मृत्यू 

रुग्णवाहिका वेळेत मिळाली नाही, त्यामुळेच मृत्यू ओढवल्याचा आरोप त्या महिलेच्या पतीने केला आहे.  या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थानी केली आहे. तसेच या भागातील अशा आरोग्याच्या नेहमीच्या समस्या आहेत. अशा अनेक घटना यापूर्वीही घडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. 

स्वातंत्र्यानंतरही आम्हाला कोणीही वाली नाही. या आमच्या भागात अशा आरोग्याच्या घटना सतत घडत आहेत. ह्यापेक्षा दुर्दैव ते काय आहे. ह्याकडे प्रशासनाने लक्ष देऊन जनतेचे प्रश्न मार्गी लावावे हीच अपेक्षा आहे.
- प्रदीप कामडी, ग्रामस्थ पिंपळशेत 

पिंपळशेत खरोंडा येथील हुंबरन गावातील रस्ता, आरोग्य, वीज, रूग्णवाहिका, शाळा असा या भागातील अनेक समस्यांबाबत शासन दरबारी मागण्या केली आहे. तसेच रस्ता, वीज, शाळा, अंगणवाडी ह्या समस्या मिळाव्यात म्हणून प्रयत्न सुरू आहेत. 
- गुलाब विनायक राऊत. जि.प.सदस्य

वाशिम: जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खासदार-आमदारांची एकमेकांना शिविगाळ


विदर्भाचे प्रेम आम्हाला शिकविण्याची गरज नाही; मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा विरोधकांना टोला


राजधानीतील पाच भागातील इंटरनेट सेवा बंद, ट्रॅक्टर रॅलीतील हिंसाचारानंतर गृह मंत्रालयाचा निर्णय


शेतकरी आंदोलन हिंसक होण्यास पंतप्रधान मोदी जबाबदार : पृथ्वीराज चव्हाण


आता 'थलाईवा' आणि 'खिलाडी'मध्ये होणार जबरदस्त मुकाबला; दिवाळीमध्येच दोघांचे चित्रपट होणार रिलीज


दिल्ली : दंगेखोरांशी पूर्ण शक्तीने निपटण्याचे निर्देश, निमलष्करी दलाचे १५०० जवान तैनात


बारामती : पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू 


आंदोलक शेतकऱ्यांना सरळ जेलमध्ये टाका, त्यांची संपत्ती हिसकावून घ्या; अभिनेत्री कंगणा राणावतचे वादग्रस्त वक्तव्य


दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण; अमित शाह यांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक


मुंबईच्या आंदोलनाला भेंडीबाजाराशी जोडणं दुर्दैवी : शरद पवार