Tue, Aug 04, 2020 13:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कर्करोगाने संजय गांधी उद्यानातील 'आनंद' हरपला

कर्करोगाने संजय गांधी उद्यानातील 'आनंद' हरपला

Last Updated: Jul 09 2020 7:50PM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

बोरिवलीच्या 'संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील व्याघ्र सफारीमधील 'आनंद' या १० वर्षीय वाघाचा कर्करोगाने पहाटे मृत्यू झाला. गेल्या महिन्याभरापासून 'आनंद' हा ओठावरील कर्करोगजन्य गाठीने ग्रस्त होता. त्याला वाचविण्यासाठी पशुवैद्यकांनी अथक प्रयत्न केले मात्र यानंतरही पहाटे त्याच्या मृत्यू झाला.

वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेना मंत्र्यांची बैठक

नॅशनल पार्कच्या व्याघ्र सफारीचे आकर्षण असणाऱ्या 'आनंद' या नर वाघाच्या खालच्या ओठावर गाठ निर्माण झाली होती. काही दिवसांपू्र्वी मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या तज्ज्ञ पथकाने त्याची तपासणी करून बायोप्सी केली होती. या तपासणीत त्याला कर्करोग झाल्याचे समोर आले होते. 

युजीसीबरोबर चर्चा करूनच परीक्षा रद्द करण्याचा निर्णय: उदय सामंत

काही दिवसांपासून याची प्रकृती खालावत चालली होती. या आठवड्यात त्याने अन्न पाणी घेणे बंद केले होते. त्यामुळे आनंदला आयव्ही फ्लूइड्स आणि सप्लिमेन्टस् देण्यात येते होते. मात्र या झुंजीत आनंद पराभूत झाला आणि त्याने जीव सोडला. नॅशनल पार्कच्या व्याघ्र सफारीतला 'आनंद' गेल्यामुळे आता येथे नागपूरहून आणलेल्या सुलतानसह इतर चार वाघिणीच राहिल्या आहेत.