Tue, Sep 22, 2020 09:18होमपेज › Mumbai-Thane-Raigad › टेन्शन वाढलं! देशात कोरोनामुळे ९९ डॉक्टरांचा मृत्यू; रेड अलर्ट जारी

टेन्शन वाढलं! देशात कोरोनामुळे ९९ डॉक्टरांचा मृत्यू; रेड अलर्ट जारी

Last Updated: Jul 16 2020 1:24PM

file photoनवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा 

देशात कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावाचा विळखा अधिक घट्ट होत असल्याचे दिसून येत आहे. दिवसागणिक ​कोरोनाबाधितांची उच्चांकी भर पडत आहे. कोरोना रुग्णांच्या मृत्यूसंख्येतही वाढ दिसून येत आहे. वैद्यकीय तज्ज्ञांनी त्यामुळे चिंता व्यक्त केली आहे. 

वाचा : महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्य निवडणूक आयुक्त निला सत्यनारायण यांचे कोरोनामुळे निधन 

नियंत्रण क्षेत्र धोरण तसेच भौतिक दूरत्वाच्या नियमाचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन यानिमित्ताने केले जात आहे. गेल्या एका दिवसात देशभरात उच्चांकी ३२ हजारांहून अ​धिक कोरोनाग्रस्तांची भर पडली. तर, ६०० हून अधिक कोरोना रूग्णांचा बळी गेल्या. एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना दुसरीकडे कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढले आहे. तर कोरोना संसर्गासोबत दोन हात करताना आतापर्यंत देशभरात ९९ डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) कडून देण्यात आली आहे. 
 
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार गुरुवारी सकाळपर्यंत देशात तब्बल ३२ हजार ६९५ नवीन कोरोनाबाधित आढळून आले. तर, ६०६ रूग्णांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे यादरम्यान २० हजार ७८३ रुग्णांनी कोरोनवर मात मिळवल्याने त्यांना विविध रुग्णालयात डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या त्यामुळे ९ लाख ६८ हजार ८७६ झाली आहे. यातील ६ लाख १२ हजार ८१५ रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. तर, ३ लाख ३१ हजार १४६ रुग्णांवर देशातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आतापर्यंत २४ हजार ९१५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनामुक्तीचा दर ६३.२५ टक्के झाला आहे. तर, कोरोनामुक्ती तसेच मृत्यूचे प्रमाण हे अनुक्रम ९६.०९ टक्के तसेच ३.९१ टक्के नोंदवण्यात आले आहे.

वाचा : मिनिमम बॅलन्स 'इतका' ठेवा अन्यथा बसेल फटका; 'या' बँकांनी बदलले नियम

सर्वांधिक कोरोनाप्रभावित महाराष्ट्रासह (७,९७५), तामिळनाडू (४,४९६), कर्नाटक (३,१७६), आंध प्रदेश (२,४३२), दिल्ली (१,६४७), उत्तर प्रदेश (१,६५९) तसेच पश्चिम बंगालमध्ये (१,५८९) आढळून आले आहेत. या राज्यांच्या पाठोपाठ तेलंगणा (१,५९७), बिहार (१,३२८), गुजरात (९१५), राजस्थान (८६६), केरळ (६२३) तसेच मध्य प्रदेशात (६३८) कोरोनाबाधितांची भर पडली.

गेल्या एका दिवसात महाराष्ट्रात सर्वांधिक २३३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. महाराष्ट्रा पाठोपाठ कर्नाटक ८७, तामिळनाडू ६८, आंध प्रदेश ४४, दिल्ली ४१, पश्चिम बंगाल २०, तेलंगणा ११, गुजरात १० तसेच मध्य प्रदेशात ९ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रातील मृत्यूदर हा ४ टक्के नोंदवण्यात आला आहे. तर, जगाच्या ४.४० टक्के मृत्यूदराच्या तुलनेत गुजरातमधील कोरोना मृत्यूदर सर्वांधिक म्हणजे ४.७५ टक्के नोंदवण्यात आला आहे.
 
बुधवारी दिवसभरात देशातील तब्बल ३ लाख २६ हजार ८२६ नागरिकांच्या वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत देशात १ कोटी २७ लाख ३९ हजार ४९० नागरिकांच्या कोरोना तपासण्या करण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. 

बीएसएफमधील ६८ जवानांना कोरोनाची लागण

गेल्या एका दिवसात बीएसएफमधील ६८ जवानांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. बीएसएफमधील कोरोनाबाधितांची संख्या त्यामुळे २ हजार ९३ झाली असून यातील १ हजार ६० जवानांनी कोरोनावर मात मिळवली आहे. १ हजार २४ जवानांवर उपचार सुरु आहेत. तर, आयटीबीपी मध्ये ३५ जवानांमध्ये कोरोना संसर्ग आढळला आहे. आयटीबीपीतील ३५६ जवानांनी कोरोनावर मात मिळवली आहे. ३४८ जवानांवर उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. 

डाॅक्टरांना काळजी घेण्याचे आवाहन

कोरोना संसर्गासोबत दोन हात करताना आतापर्यंत देशभरात ९९ डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) कडून देण्यात आली आहे. आयएमएने त्यामुळे रेड अलर्ट काढून रुग्णालय तसेच ​वैद्यकीय प्रशासकांना डॉक्टरांना कोरोनाचा प्रार्दुभाव होवू नय यासाठी काळजी घेण्याची विनंती करण्यात आली आहे. आयएमअकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार कोरोनाविरोधातील युद्धात आघाडीवर लढत असलेल्या १ हजार ३०२ डॉक्टरांना कोरोनाची बाधा झाली. तर, ९९ डॉक्टरांचा मृत्यू झाला. यातील ७३ डॉक्टरांचे वय हे ५०वर्षांहून जास्त नव्हते. ३५ ते ५० वयोगटातील १९ आणि ३५ हून कमी वय असलेल्या सात डॉक्टरांचा मृत्यू झाल्याची माहिती आयएमएकडून देण्यात आली आहे.

वाचा : लॉकडाऊनचा फटका; एअर इंडिया कर्मचाऱ्यांना ५ वर्षांपर्यंत बिनपगारी सुट्टीवर पाठवणार 

 "