Sat, Sep 19, 2020 08:34होमपेज › Mumbai-Thane-Raigad › देशात २४ तासांत ८०३ जणांचा मृत्यू 

देशात २४ तासांत ८०३ जणांचा मृत्यू 

Last Updated: Aug 04 2020 11:29AM

file photoनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

देशात कोरोना रुग्णांचा वाढता आकडा कायम आहे. गेल्या २४ तासांत ५२ हजारांहून अधिक रुग्णांची भर पडली आहे. तर ८०३ जणांचा मृत्यू झाला आहे.

वाचा : ‘अगरबत्ती’तून उडविणार चीनचा धुव्वा!

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ५२ हजार ५० रुग्ण आढळून आले. यामुळे रुग्णसंख्या १८ लाख ५५ हजार ७४६ वर पोहोचली आहे. यातील ५ लाख ८६ हजार २९८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आतापर्यंत १२ लाख ३० हजार ५१० रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत कोरोनाने ३८ हजार ९३८ जणांचा बळी घेतला आहे.

वाचा : कोरोनावरील लसीच्या मानवी चाचणीसाठी ‘सीरम’ला परवानगी

दरम्यान, पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या कोविड-१९ लसीच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्यातील मानवी चाचणीस ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून (डीसीजीआय) परवानगी मिळाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. ही चाचणी भारतात घेतली जाणार आहे. 

वाचा : ‘अगरबत्ती’तून उडविणार चीनचा धुव्वा!

संपूर्ण जगाला त्रस्त केलेल्या कोरोना व्हायरसवरील ऑक्सफोर्डच्या लसीने आशेचा किरण दाखवला आहे. याच मालिकेत सीरमची पुढच्या वर्षभरात एक अब्ज लस निर्मितीची योजना आहे. सीरम एकूण लस उत्पादनांपैकी ५० टक्के लसी भारतासाठी उपलब्ध करून देणार असून, उर्वरित लसी अन्य देशांना पाठविण्यात येतील. सर्व काही नियोजनानुसार झाले, तर नोव्हेंबर महिन्यापर्यंत भारतात लस उपलब्ध होऊ शकते. 
 

 "