Mon, Sep 21, 2020 12:33होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कल्याण डोंबिवली मनपा परिक्षेत्रात ३६८ कोरोना रुग्णांची भर

कल्याण डोंबिवली मनपा परिक्षेत्रात ३६८ कोरोना रुग्णांची भर

Last Updated: Aug 12 2020 9:41PM

संग्रहीत छायाचित्रकल्याण : पुढारी वृत्तसेवा

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात बुधवारी नव्याने ३६८ कोरोना रुग्णांची भर पडली असून कोरोनाने आठ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे आजपर्यंतच्या कोरोनाबाधित रुगणाची संख्या २३२१७ इतकी झाली आहे. तर मृत्यूचा आकडा ४६६ वर जाऊन पोहचला आहे. गेल्या २४ तासांत २३२ जणांना  डिस्चार्ज देण्यात आला. 

राज्यात कोरोना चाचण्यांच्या दरात पुन्हा कपात

बुधवारी नव्याने भर झालेल्या ३६८ कोरोनाबाधित रूग्णांमध्ये सर्वाधिक १०१ रुग्ण डोंबिवली पूर्व परिसरात सापडले आहेत. त्या खालोखाल कल्याण पूर्व - ९०, कल्याण पश्चिम - ७२, डोंबिवली पश्चिम - ५६, मांडा टिटवाळा - ३१,  मोहना - १६ तर पिसवली परिसारत २ असे रुग्ण सापडले आहेत.  

साधा संधी! एसएसबी कॉन्स्टेबल भरती २०२० प्रक्रिया सुरु; ७० हजारांपर्यंत पगार

आजपर्यंतच्या एकूण रुग्णांपैकी  ४१९० पालिकेच्या व अन्य खासगी रुग्णालयात उपचार घेत असून १८ हजार ५६१ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गत २४ तासात २३२ बरे झालेल्या रूग्णांना डिस्चार्ज  मिळाला असून १०७ रुग्ण हे टाटा आमंत्रा, ह.भ.प.सावळाराम महाराज म्हात्रे क्रिडा संकुल येथून ०५, आर. आर. रुग्णालय ०४, रुग्ण हॉलिक्रॉस रुग्णालयामधून ०४, रूग्ण पाटीदार कोव्हिड केअर सेंटरमधून ०४, रूग्ण शास्त्रीनगर रूग्णालयातून व उर्वरित रुग्ण हे इतर रुग्णालयांमधून तसेच होम आयसोलेशनमधुन बरे झालेले आहेत.

 "