Mon, Sep 21, 2020 11:50होमपेज › Mumbai-Thane-Raigad › देशात कोरोनाचा उद्रेक कायम; मृतांचा आकडा ३८ हजारांवर!

देशातील मृतांचा आकडा ३८ हजारांवर!

Last Updated: Aug 03 2020 10:15AM

file photoनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

देशात गेल्या २४ तासांत ५२ हजारांहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर ७७१ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशातील रुग्णसंख्येचा आकडा १८ लाखांवर पोहोचला आहे.

वाचा : रुग्ण बरा झाल्यावरही जाणवतात ‘ही’ लक्षणे

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात २४ तासांत नवीन ५२ हजार ९७२ रुग्णांची भर पडली, तर ७७१ जणांचा मृत्यू झाला. देशातील एकूण रुग्णसंख्या १८ लाख ३ हजार ६९६ एवढी झाली आहे. यातील ५ लाख ७९ हजार ३५७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आतापर्यंत ११ लाख ८६ हजार २०३ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. देशातील मृतांचा आकडा ३८ हजार १३५ वर पोहोचला आहे. 

वाचा : सांगलीच्या मध्यवर्ती कारागृहात कोरोनाचा शिरकाव; ६३ बंदिवानांना लागण

देशातील कोरोनामुक्तीचे प्रमाण वेगाने वाढत असल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे, दिवसागणीक रुग्णसंख्या वाढत असल्याने कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचे आव्हान अजूनही केंद्रासह राज्य सरकारांसमोर उभे आहे.

 "