Sat, Sep 19, 2020 16:42होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ७०० कोटींचा परकीय चलन घोटाळा उघड

७०० कोटींचा परकीय चलन घोटाळा उघड

Last Updated: Feb 14 2020 2:09AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

कॅपस्टॉन फॉरेक्स प्रा. लि. कंपनीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या तब्बल 700 कोटींच्या परकीय चलन घोटाळ्याचा सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) पर्दाफाश केला आहे. बनावट विमान प्रवास तिकिटे आणि पासपोर्टच्या आधारे हा घोटाळा करण्यात आल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले आहे.

एडेलवेस फायनान्शियल सर्व्हिसेस लि. कंपनीचे अध्यक्ष राशेश शहा यांच्या चौकशीमध्ये कॅपस्टॉन फॉरेक्स प्रा. लि. कंपनीचे नाव ईडीच्या रडारवर आले. बनावट विमान तिकिटे, बनावट पासपोर्टच्या माध्यमातून परकीय चलन आणण्यात आले. ते बनावट कंपन्यांच्या खात्यात जमा करुन 700 कोटींचा घोटाळा करण्यात आला आहे. बनावट कंपन्यांमधून हे पैसे प्रख्यात कंपन्यांच्या खात्यात जमा करण्यात आल्याचा ईडीला संशय आहे. यातूनच बॉलीवूड अभिनेत्री जुही चावला हीचे पती जय मेहता यांच्या ग्रुपच्या सी. जी. पॉवर सोल्यूशन्स आणि इंडियानापोल्स हॉस्पिटॅलिटी सोबतच कन्सुलेटशहा फायनान्शियल सर्व्हिसेस, इरोस इंटरनॅशनल मीडिया, जैन एनर्जी (जैन इरिगेशन ग्रुप), नवरकर बिल्डर्स, पुढील जनरल फिल्म्स आणि स्वातंत्र्यवीर व्ही. डी. सावरकर मल्टीस्टेट को. क्रेडिट पत संस्थेची ईडीकडून तपासणी सुरु आहे.

बहुतांश बनावट कंपन्यांच्या मालकांकडे चौकशीमध्ये ते कॅपस्टॉन फॉरेक्स कंपनीमध्ये आर्थिक व्यवहारांबाबत माहिती देऊ शकले नाही. कॅपस्टॉन फॉरेक्स कंपनीची 2015 मधील सहा कोटींची उलाढाल 2018 मध्ये तब्बल 315 कोटींवर पोहचल्याचे उघड झाले आहे. यात 2017 ते 2019 या काळात विविध बनावट कंपन्यांकडून मोठ्याप्रमाणात निधी वळविण्यात आल्याची माहिती मिळते. यासाठी कॅपस्टॉन फॉरेक्स कंपनीने तपासणीमध्ये सादर केलेली विमान तिकिटे आणि पासपोर्ट बनावट असल्याचे उघड झाले आहे.

 "