Tue, Aug 04, 2020 13:30होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यातील बाधितांची विक्रमी वाढ सुरुच!

राज्यातील बाधितांची विक्रमी वाढ सुरुच!

Last Updated: Jul 09 2020 9:01PM

संग्रहित छायाचित्रमुंबई : पुढारी वृत्तसेवा 

राज्यात कोरोना साखळी तोडण्यासाठी आरोग्य विभाग कष्ट घेत असताना मात्र रूग्णांच्या संख्येत वाढच होत आहे. राज्यात मागील २४ तासांत कोरोनाबाधितांच्या आकड्याने साडेसहा हजाराचा आकडा पार केला आहे. हा आकडा ६ हजार ७८५ झाला आहे, तर २१९ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. एकीकडे राज्याला कोरोनाचे हादरे बसत असतानाच समाधानाची बाब म्हणजे गेल्या २४ तासांमध्ये ४ हजार ६७ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यात बरे होणाऱ्यांची संख्या १ लाख २७ हजार २५९ इतकी झाली असून  रिकव्हरी रेट ५५.१९ टक्के झाला आहे.

बाजारात तेजीमय वातावरण! सेन्सेक्स, निफ्टीची उसळी

राज्यात आतापर्यंत २१९ जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने राज्याचा मृत्यूदर ४.१९ टक्के वर पोहचला आहे. तसेच आजपर्यंत १२ लाख २२ हजार ४८७ नमुने तपासणीसाठी पाठविले असून  त्यापैकी २ लाख ३० हजार ५९९ नमुने करोना पॉझिटिव्ह आले आहेत. 

सध्या राज्यात ६ लाख ४९ हजार २६३ व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर ४८ हजार १९१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात गेल्या चोवीस तासात ६ हजार ७८५ रूग्ण सापडल्यानंतर ९३ हजार ६५२ इतकी अॅक्टिव्ह रुग्ण संख्या झाली आहे.

'कोरोनाशी लढाई एकांगी नको'

प्रमुख शहरांतील अॅक्टिव्ह रूग्ण

मुंबई- २३ हजार ७८५

ठाणे- ३० हजार ५०६

पुणे- १७ हजार २२६

नाशिक- २५३४

औरंगाबाद- ३६९१

नागपूर- ४९१