Sun, Sep 20, 2020 06:03होमपेज › Mumbai-Thane-Raigad › देशात कोरोनाचे थैमान सुरुच; २४ तासांत ६० हजारांवर रुग्ण, ८३४ जणांचा मृत्यू 

देशात कोरोनाचे थैमान सुरुच; २४ तासांत ६० हजारांवर रुग्ण, ८३४ जणांचा मृत्यू 

Last Updated: Aug 12 2020 10:17AM

file photoनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

देशात कोरोनाचे थैमान सुरुच आहे. गेल्या २४ तासांत देशात ६० हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. तर ८३४ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णांचा वाढता आकडा कायम असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.     

वाचा : देशात केवळ 28.21 टक्के बाधित! 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत ६० हजार ९६३ रुग्णांची नोंद झाली. तर ८३४ जणांचा मृत्यू झाला. यामुळे देशातील एकूण रुग्णांचा आकडा २३ लाख २९ हजार ६३९ वर पोहोचला आहे. यातील ६ लाख ४३ हजार ९४८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आतापर्यंत १६ लाख ३९ हजार ६०० रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. देशातील मृतांचा एकूण आकडा ४६ हजार ९१ वर पोहोचला आहे.

वाचा : वडिलोपार्जित संपत्तीत मुलींनाही वाटा

देशात दिवसागणीक कोरोना महारोगराईचा विळखा घट्ट होत असताना काल मंगळवार थोडा दिलासा देणारा ठरला होता. काल कोरोनाबाधितांच्या संख्येत किरकोळ घट झाली होती. मात्र, आज पुन्हा कोरोना रुग्णसंख्येने ६० हजारांचा टप्पा पार केला. 

 "