Thu, Jul 02, 2020 18:22होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाण्यात कोरोना बाधित रूग्णाचा मृत्यू

ठाण्यात कोरोना बाधित रूग्णाचा मृत्यू

Last Updated: Apr 18 2020 1:57PM
ठाणे : पुढारी वृत्तसेवा

ठाण्यात कोरोना बाधित ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही व्यक्ती ठाण्यातील गार्डन इस्टेट या भागात वास्तव्यास होती. मागील पाच ते सहा दिवसांपासून त्यांच्यावर होरायझन या रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यांची कोणतीही ट्रॅव्हल हिस्ट्री नव्‍हती. या रुग्णाला यापूर्वी अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यानंतर आता कोरोनाची लागण झाली होती. 

आज सकाळी त्याला हृदयविकाराचा झटका आला असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे मृत्यू कोरोनामुळेच झाला का? हे तपासणीनंतर स्पष्ट होणार असले तरी ती व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह होती,असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे ठाण्यातील कोरोना बाधित मृत्यू झालेल्या रुग्णाचा आकडा दोनवर जाऊन पोहोचला आहे. तर आता पर्यंत ११५ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.