Tue, Aug 04, 2020 14:24होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बांगला देशातून महाराष्ट्रात येणार 'रेमडेसिवीर' औषध

बांगला देशातून महाराष्ट्रात येणार 'रेमडेसिवीर'

Last Updated: Jul 08 2020 8:16AM

संग्रहित छायाचित्रमुंबई : पुढारी वृत्तसेवा

देशात सध्या रेमडेसिवीर औषध निर्मितीसाठी फक्त दोन कंपन्या आहेत. मागणी जास्त असून साठा नसल्याने अखेर बांगला देशातून एका कंपनीकडून ५ हजार तयार इंजेक्शन मागविण्यात आले आहेत. पण, ते भारतात आणण्यासाठी काही परवानग्या बाकी असून कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर हे इंजेक्शन देशात येणार आहेत. यासाठी ऑल फूड ड्रग्ज अॅण्ड लायसन्स होल्डर फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे.

अधिक वाचा :  आजपासून हॉटेल्स; पुढील आठवड्यात रेस्टॉरंट्स सुरू होणार

कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना कोरोना रुग्णांवरील उपचारांसाठी रेमडेसिवीर हे इंजेक्शन प्रभावी ठरत आहे. मात्र या इंजेक्शनचा तुटवडा असल्यामुळे हे इंजेक्शन सध्या कोणत्याही केमिस्ट किंवा रुग्णालयात उपलब्ध होत नाही. त्यामुळे ऑल फूड ड्रग्ज अॅण्ड लायसन्स होल्डर असोसिएशनने पुढाकार घेऊन येत्या काळात राज्यात कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी ५ हजार इंजेक्शन मागवणार आहे. 

अधिक वाचा :  सेना आमदारासह ठाण्यात १३४० नवे कोरोना रुग्ण

यासाठी ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियाला पत्र लिहिले असून या लवकरच हे इंजेक्शन मागवण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. ड्रग कंट्रोलर ऑफ इंडिया आणि सरकारने मंजूरी दिली की दोन दिवसांत हे इंजेक्शन राज्याच्या जनतेसाठी उपलब्ध होईल, असे ऑल फूड ड्रग्ज अॅण्ड लायसंस होल्डर फाउंडेशनचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष अभय पांडे यांनी स्पष्ट केले आहे. 

अधिक वाचा : पदवी परीक्षा घेण्यास तीव्र विरोध

देशात सध्या सिप्ला आणि हेट्रो या दोन कंपन्यांकडे हे इंजेक्शन बनविण्याची परवानगी आहे. हेट्रो कंपनीकडून काही प्रमाणात हे उत्पादन सुरू झाले आहे. मात्र मुबलक प्रमाणात हे इंजेक्शन मिळण्यासाठी २० ते २५ दिवस लागू शकतात. त्या आधीच महापालिकेने १० हजार इंजेक्शन ऑर्डर दिल्याने इतर रुग्णांना ते औषध मिळण्यास त्याहून जास्त वेळ लागू शकतो. त्याच प्रमाणे सिप्ला कंपनीचे हे उत्पादन बाजारात येण्यासाठीही अजून किमान २० दिवस जाऊ शकतात. 

त्यामुळे त्यामुळे बांगला देशांत या इंजेक्शनचा ५००० चा साठा उपलब्ध असल्याने व्हीजे कंपनीच्या मदतीने हा साठा आणण्यात येणार आहे, अशी माहिती पांडे यांनी दिली तसेच तसेच पाईपलाईनमध्ये असलेल्या कंपन्यांना लवकर परवानगी मिळण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.