Fri, Sep 25, 2020 15:54होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई : डोंबिवलीत ५ वर्षांच्या मुलालाही कोरोना

मुंबई : डोंबिवलीत ५ वर्षांच्या मुलालाही कोरोना

Last Updated: Apr 10 2020 3:39PM

संग्रहित फोटोडोंबिवली : पुढारी वृत्तसेवा

कल्याण-डोंबिवलीतील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच असून शुक्रवारी कल्याण-डोंबिवलीत आणखी ६ रुग्ण आढळल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा ४९ वर पोहोचला आहे. ज्यामध्ये एका ५ वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. विशेष म्हणजे शुक्रवारी आढळलेल्या ६ रुग्णांपैकी ५ रुग्ण हे डोंबिवली पूर्वेतील आणि १ रुग्ण कल्याण पूर्वेतील आहे.

मुंबई : दाटीवाटीने राहणाऱ्यांसाठी शाळांमध्ये व्यवस्था

येथे सापडलेल्या नविन ६ रुग्णांमुळे कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ४९ वर जाऊन पोहोचला असून त्यामध्ये डोंबिवली पूर्वेतील सर्वाधिक म्हणजे २५ रुग्णांचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. १० एप्रिलपर्यंत रुग्‍ण संख्‍या एकूण ६ इतकी वाढली आहे. डोंबिवली पूर्वेत ५२ वर्षीय महिलेसह एका ५ वर्षीय मुलग्याला तसेच ३० ते ३२ दरम्यानच्या वय असणाऱ्या दोन महिलांचा समावेश आहे. शुक्रवारपर्यंतच्या एकूण ४९ रुग्णांपैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. ९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ३८ रुग्ण उपचार घेत आहेत. यात कल्‍याण पूर्वेतील ९, कल्‍याण पश्चिमेतील ७, डोंबिवली पूर्वेतील २५, डोंबिवली पश्चिमेतील ७, तर टिटवाळ्यातील एकाचा समावेश आहे.

राज्यात १२५ कोरोना बाधित ठणठणीत बरे झाले!

राज्यात 24 तासांत 25 जणांचा मृत्यू

 "